कोरेगाव खुर्दच्या विद्यार्थ्यांची शिष्यवृत्तीत बाजी

कोरेगाव खुर्दच्या विद्यार्थ्यांची शिष्यवृत्तीत बाजी
Published on

आंबेठाण, ता. २७ : कोरेगाव खुर्द (ता. खेड) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील १० विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय शिष्यवृत्ती परीक्षेत घवघवीत यश संपादन केले आहे. यात चार विद्यार्थी राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक (NMMS), तर सहा विद्यार्थी ‘सारथी’ शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरले आहेत.
एनएमएमएस अंतर्गत अस्मिता कडूसकर, पूर्वा घनवट, शिवराज काळे आणि चेतन रेटवडे यांना इयत्ता ९ वी ते १२ वी पर्यंत वार्षिक १२ हजार रुपये शिष्यवृत्ती मिळणार आहे. तसेच, अंकिता सूर्यवंशी, अभिमन्यू बुट्टे, श्रद्धा झांबरे, यश जाचक, अर्णव गोगावले आणि सोहम बुट्टे या सहा विद्यार्थ्यांना ‘सारथी’ शिष्यवृत्तीच्या माध्यमातून वार्षिक ९ हजार ६०० रुपये मिळणार आहेत. या यशामुळे विद्यार्थ्यांच्या उच्च शिक्षणाचा मार्ग सुकर झाल्याची भावना केंद्रप्रमुख छाया फल्ले व मुख्याध्यापक स्वाती खैरे यांनी व्यक्त केली.
या यशाबद्दल शिक्षणाधिकारी संजय नाईकडे, गटशिक्षणाधिकारी अमोल जंगले व विस्तार अधिकारी वामन सूर्यवंशी यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले. ग्रामस्थांच्या वतीने सरपंच सीमा झांबरे व शाळा व्यवस्थापन समितीच्या पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत विद्यार्थ्यांचा विशेष सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे नियोजन सुनील मरभळ, रेखा पवळे, अर्चना मरभळ यांनी केले, तर पल्लवी अभ्यंकर यांनी आभार मानले.

03605

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com