गांधलेमळा शाळेत कलाविष्कारांची बहार

गांधलेमळा शाळेत कलाविष्कारांची बहार

आंधळगाव, ता. १० : इनामगाव (ता. शिरूर) येथील गांधलेमळा जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत सोमवारी (ता. ४) रोजी वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात झाले. या स्नेहसंमेलनात सावित्रीच्या लेकींनी प्रदर्शित केलेल्या कलाविष्कारांनी पालकांसह नागरिकही मंत्रमुग्ध झाले. विद्यार्थ्यांचे कौतुक करत पालकांनी बक्षिसांचा वर्षाव केला.

या कार्यक्रमास जिल्हा परिषदेच्या कृषी व पशुसंवर्धन समितीच्या माजी सभापती सुजाता पवार, सरपंच अनुराधा घाडगे, माजी सरपंच पल्लवी घाडगे, वैजयंता घाडगे, रंजना गांधले यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून स्नेहसंमेलन सुरवात केली. या वेळी कैलास गांधले, अनिल शिंदे, बाळासो गांधले, नवनाथ गांधले, अण्णा कदम, पोपट घाडगे, सुरेश गांधले, कल्याण गांधले, कल्याण घाडगे, सुभाष गांधले आदी उपस्थित होते.

याप्रसंगी विद्यार्थ्यांनी भक्ती गीते, लावणी नृत्य, देशभक्तिपर गीते अशा कार्यक्रमातून राज्याच्या सांस्कृतिक वारशाचे दर्शन घडविले. दरम्यान, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष गोकूळ घाडगे, उपाध्यक्ष दीपक माने, इतर सदस्य, वाघजाई तरुण मंडळ, मुख्याध्यापक निजाम शेख, सारिका कदम यांनी परिश्रम घेतले. दत्तात्रेय सोनवणे यांनी सूत्रसंचालन केले. आभार सुनील गांधले यांनी मानले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com