कळसकरवाडी सोसायटीच्या अध्यक्षपदी कळसकर

कळसकरवाडी सोसायटीच्या अध्यक्षपदी कळसकर

Published on

आंधळगाव, ता. ३ : तांदळी (ता. शिरूर) येथील कै. रघुनाथ वामनराव कळसकर विविध कार्यकारी सहकारी सोसायटी कळसकरवाडीच्या अध्यक्षपदी संतोष भाऊसाहेब कळसकर व उपाध्यक्षपदी पांडुरंग सोपाना कळसकर यांची बिनविरोध निवड झाली. सोसायटीचे माजी अध्यक्ष संपत कळसकर व उमावती शेळके यांनी सर्व संचालकांना काम करण्याची संधी मिळावी म्हणून, राजीनामा दिल्याने रिक्त असलेल्या जागेसाठी निवडणूक घेण्यात आली. संतोष कळसकर व पांडुरंग कळसकर यांनी एकमेव अर्ज दाखल केल्याने त्यांची बिनविरोध निवड झाल्याचे निवडणूक अधिकारी ए. एच. धायगुडे, सचिव गोविंद कळसकर यांनी जाहीर केले. याप्रसंगी घोडगंगाचे माजी उपाध्यक्ष प्रा. सुभाष कळसकर, दिलीप कळसकर, लक्ष्मण कळसकर, अप्पा कळसकर, संजय कळसकर, शहाजी कळसकर, मारुती कळसकर, संभाजी गोसावी, विजय कळसकर आदी उपस्थित होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.