इनामगावचा पालखी सोहळा पंढरपूरच्या दिशेने

इनामगावचा पालखी सोहळा पंढरपूरच्या दिशेने

Published on

आंधळगाव, ता. ८ : इनामगाव (ता. शिरूर) येथील संत मुकिंदराज महाराज, संत परब्रह्म अनंत गोपाळनाथ स्वामी महाराज पालखी सोहळ्याचे ज्ञानोबा तुकारामांचा गजर करत भक्तिमय वातावरणात शुक्रवारी (ता. ५) पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान झाले. या सोहळ्याचे यंदा चौदावे वर्ष आहे.
अभिषेक, विधिवत पूजा, वीणा आणि पादुका पूजन केल्यानंतर टाळ-मृदंगाच्या गजरात मिरवणूक काढण्यात आली. यावेळी ग्रामस्थांनी घरासमोर रांगोळीच्या पायघड्या घालत पालखीचे स्वागत केले. उन्हाची चटक असताना देखील भाविकांनी गर्दी केली होती. सोहळ्यात सहभागी असलेले दिंडी प्रमुख वीणेकरी, मृदंगमणी, पताका घेणारे, चोपदार, तुळशी वृंदावन घेणाऱ्या महिला तसेच वारकऱ्यांचा सन्मान करण्यात आला. पालखी सोहळा दौंड, बोरीबेल, राजेगाव, डाळज नंबर २, जंक्शन स्टेशन, तरंगे वस्ती रेडणी, फडतरे वस्ती, वेळापूर, पिराची कुरवली, वाखारी या गावांमध्ये मुक्काम करीत पंढरपूर येथे पोहोचणार आहे. ठिकठिकाणी महाप्रसाद आणि कीर्तनाचे ग्रामस्थांकडून आयोजन केले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.