प्रथमेश घाटगेची आंतरराष्ट्रीय कुस्ती स्पर्धेसाठी निवड

प्रथमेश घाटगेची आंतरराष्ट्रीय कुस्ती स्पर्धेसाठी निवड

Published on

आंधळगाव, ता. १० : आजची पिढी मोबाईल आणि पुस्तकांच्या खाली चिरडून गेली आहे. कुस्ती हा महत्त्वाचा खेळ आहे. शक्ती आणि युक्तीच्या साहाय्याने हा खेळ खेळला जातो. विद्यार्थ्यांनी बौद्धिक श्रमाबरोबरच शारीरिक श्रमाकडेही लक्ष द्यायला हवे असे मत संस्थेचे अध्यक्ष राजीव फराटे यांनी व्यक्त केले.
मांडवगण फराटा (ता. शिरूर) येथील आयोजित सत्कार समारंभात ते बोलत होते. मांडवगण फराटा (ता. शिरूर) येथील श्री. वसंतराव फराटे पाटील कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालयाचा विद्यार्थी प्रथमेश शंकरराव घाटगे याने चंडीगड येथे पार पडलेल्या राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत ८२ किलो वजन गटात प्रथम क्रमांक मिळवला. कझाकस्तान येथे होत असलेल्या आंतरराष्ट्रीय कुस्ती स्पर्धेसाठी त्याची निवड झाली आहे. प्रथमेश हा बीबीएच्या तृतीय वर्षात शिक्षण घेत आहे. श्री वाघेश्वर ग्रामविकास प्रतिष्ठान संस्थेचे अध्यक्ष राजीव फराटे पाटील यांच्या हस्ते त्याचा सत्कार केला. याप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष राजीव फराटे पाटील, सचिव मृणाल फराटे पाटील, उपप्राचार्य प्रवीण कुरुमकर, डॉ. हेमंत कांबळे, डॉ. विवेक सातपुते, प्रा. जयराम पवार, शंकरराव घाटगे, प्राध्यापक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी प्रथमेशचे कौतुक केले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.