पिंपळसुटीत वळणावर भरधाव टेम्पो उलटला
आंधळगाव, ता. २७ : पिंपळसुटी (ता. शिरूर) येथील बस स्थानकासमोर भरधाव टेम्पो धोकादायक वळणाचा अंदाज न आल्याने मुख्य रस्त्याच्या लगत उलटल्याची घटना मंगळवारी (ता. २७) सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास घडली. या अपघातात टेम्पोचे मोठे नुकसान झाले असून, चालक थोडक्यात बचावला आहे. चालकाला स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने टेम्पोतून त्वरित बाहेर काढत दवाखान्यात दाखल केले आहे. पिंपळसुटी येथे रस्त्याच्या धोकादायक वळणामुळे या रस्त्यावर सतत अपघात होत आहेत. सतत होणाऱ्या अपघाताच्या घटनांमुळे परिसरातील नागरिक संतप्त झाले आहेत.
या अपघातातील टेम्पो (क्र. एम.एच. ०९ बी.सी. ५९२३) आळेफाट्याहून बारामतीकडे चालला होता. यावेळी भरधाव वाहनचालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने टेम्पो मुख्य रस्त्यालगत उलटला. अपघातात वाहनचालकाला किरकोळ दुखापत झाली असून, कुठलीही जीवितहानी झालेली नाही. टेम्पोचे मोठे नुकसान झाले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

