न्हावरेत हायवाच्या धडकेत 
दुचाकीस्वार युवकाचा मृत्यू

न्हावरेत हायवाच्या धडकेत दुचाकीस्वार युवकाचा मृत्यू

Published on

आंधळगाव, ता. ९ : शिरूर-चौफुला महामार्गावर न्हावरे (ता.शिरूर) गावच्या हद्दीतील वडखेलवाडी येथे भरधाव हायवा गाडीने एका दुचाकीस्वार युवकाला चिरडले. यात त्याचा जीव गमवावा लागला. हा अपघात मंगळवारी (ता.८) रात्री पावणेनऊ वाजण्याच्या सुमारास घडला.

संदीप दत्तात्रेय नारनोर (वय ३०, रा. नागरगाव, ता. शिरूर, जि.पुणे) असे अपघातात ठार झालेल्या तरुणाचे नाव आहे. संदीप हा नागरगाव येथे कुटुंबासह राहत होता. रांजणगाव एमआयडीसी येथील कंपनीत गेल्या तीन वर्षांपासून तो नोकरीस होता. तो मंगळवारी रात्री पावणे नऊ वाजण्याच्या सुमारास शिरूर बाजूकडून नागरगाव बाजूकडे येत होता. यावेळी रस्त्यावरून जाणाऱ्या भरधाव वेगाने जाणाऱ्या हायवा गाडीच्या चालकाला रस्त्याच्या अपूर्ण कामाचा अंदाज आला नाही. त्यामुळे भरधाव हायवा गाडीवरील चालकाचा ताबा सुटल्याने समोरून येणाऱ्या मोटारसायकलवरील संदीपला खाली आला. हायवा भरधाव वेगात असल्याने संदीपच्या डोक्यावरील हेल्मेटचे अक्षरशः दोन तुकडे झाले. संदीपला गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा उपचारापूर्वीच जागीच मृत्यू झाला. दरम्यान, शरद पोपट नारनोर (रा.नागरगाव ता.शिरूर) यांनी याबाबतची फिर्याद येथील पोलिसांत दिली आहे. वाहतुकीच्या नियमांकडे दुर्लक्ष करून भरधाव वेगात वाहन चालवून मोटारसायकलचे नुकसान करून त्यास रस्त्याच्या खाली हायवा गाडीसह ओढत नेऊन अपघातामध्ये किरकोळ व गंभीर दुखापत करून मृत्यूस कारणीभूत होत अपघाताची माहिती न देता चालक पळून गेल्याप्रकरणी पोलिसांनी अज्ञात चालकाच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास शिरूर पोलिस करत आहेत. रस्त्याच्या अपूर्ण कामामुळे संदीप नारनोर यांना आपला जीव गमवावा लागला. कुटुंबातील एकुलता एक मुलगा असल्याने त्याच्या मृत्यूने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. त्यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी, एक मुलगा असा परिवार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com