घोडगंगा सुरू करण्यासाठी प्रशासन ॲक्टिव्ह मोडवर
आंधळगाव, ता.१६ : वडगाव रासाई (ता.शिरूर) येथे नुकत्याच झालेल्या सभेत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार यांनी घोडगंगा सुरू करणारच असा शब्द दिल्याने कारखाना प्रशासन आता ॲक्टिव्ह मोडवर आले आहे. त्यामुळे कारखाना सुरू करण्यासाठी हालचालींना वेग आला आहे.यामुळे कारखाना सुरू होण्याच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.
कारखाना सुरू करण्यापूर्वी दुरुस्तीच्या कामासाठी पूर्व हंगाम सुरू करण्याबाबत कारखाना प्रशासनाने याबाबत नोटीस जाहीर केली आहे. त्यानुसार शुक्रवारी कारखान्याच्या काही कामगारांनी उपस्थित राहून सकारात्मक भूमिका घेत कारखाना सुरू होण्यासाठी योग्य ते सर्व सहकार्य केले जाईल असे सांगितले तर काही कामगारांनी त्वरित पगाराची मागणी करत या निर्णयाला विरोध केला. शुक्रवारी दिवसभर उपस्थित कामगारांच्या उपस्थितीत कारखाना स्थरावर बॉयलरच्या कामाला सुरुवात करण्यात आली. बॉयलर परवाना व गाळप परवान्यासाठी कागदपत्रे सादर केल्याची माहिती कारखान्याचे प्रभारी कार्यकारी संचालक विकास पाटील यांनी दिली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

