अशोक पवार यांच्या पदयात्रेला वाघोलीकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
आंधळगाव, ता. १७ : विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने शिरूर-हवेली विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार अशोक पवार यांच्या प्रचारार्थ वाघोलीमध्ये पदयात्रा पार पडली. या पदयात्रेला वाघोलीकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिल्याचे पाहायला मिळाले.या पदयात्रेमध्ये विशेषतः महिलांची संख्या मोठ्या प्रमाणावर दिसून आली.
आमदार अशोक पवार यांच्या माध्यमातून वाघोली परिसरात मोठ्या प्रमाणात विकासकामे करण्यात आली आहेत. या विकासकामांची पोहोचपावती म्हणूनच ही आजची गर्दी झाल्याचे बोलले जात आहे. या वेळी संजय सातव, राजेंद्र सातव, कमलाकर सातव, शांताराम कटके, बाळासाहेब सातव, कैलास सातव, दौलत पायगुडे, युवराज दळवी, वसुंधरा उबाळे, जयश्री सातव, मीनाकाकी सातव, अर्चना कटके, विक्रम वाघमारे आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

