‘साहेब... मदत नको पण बिबट्याला पकडा’
आंधळगाव, ता.१९ : ‘‘साहेब... मला मदत नको. मला झालेले दुःख वनविभागाने केलेल्या पैशाच्या मदतीने कधीही भरून न निघणारे आहे. मात्र त्या नरभक्षक बिबट्याने माझ्या मुलाप्रमाणे आता दुसरा एखादा निष्पाप जीव घ्यायला नको, त्या अगोदर या बिबट्याला त्वरित पकडा,’’ अशी विनंती मृत चिमुकला शिवतेज टेंभेकर याचे वडील समाधान टेंभेकर यांनी वनविभागाच्या अधिकाऱ्यांना केली.
मांडवगण फराटा (ता.शिरूर) येथील फराटेवाडी येथे बिबट्याच्या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या चिमुकल्याच्या कुटुंबीयांना वनविभागाकडून आर्थिक मदतीचा दहा लाख रुपयांचा धनादेश देण्यात आला. जुन्नर विभागाचे उप वनसंरक्षक अमोल सातपुते यांच्या हस्ते समाधान टेंभेकर यांना हा धनादेश देण्यात आला.
फराटेवाडी येथे शुक्रवारी (ता. १५) सायंकाळी साडे सहा वाजण्याच्या सुमारास शिवतेज समाधान टेंभेकर (वय ४) यांच्यावर बिबट्याने हल्ला केला. या हल्ल्यात शिवतेजचा मृत्यू झाला होता तर शीर नसलेल्या स्थितीत त्याचा मृतदेह आढळला होता. वन विभागाला तो नरभक्षक बिबट्या पकडण्यात अद्यापपर्यंत यश आलेले नाही. दरम्यान, वनविभागाच्या वतीने टेंभेकर कुटुंबाला दहा लाख रुपयांचा धनादेश देण्यात आला.
यावेळी बोलताना उपवनसंरक्षक अमोल सातपुते म्हणाले की, मांडवगण फराटा परिसरात बिबट्याची संख्या अधिक आहे. बिबट्याला पकडण्यासाठी येथे २५ पिंजरे बसविले आहेत. ऊसतोड कामगारांच्या सुरक्षेसाठी येथील शेतकऱ्यांनी योग्य त्या उपाययोजना करायला हव्यात. या परिसरात सौर कुंपण करण्याचे काम सुरू आहे. बिबट्याला लवकरात लवकर जेरबंद करण्यात येईल. शेतात राहणाऱ्या शेतकऱ्यांनी घराला कुंपण करून घ्यावे.
यावेळी जुन्नर विभागाचे उप वनसंरक्षक अमोल सातपुते,शिरूरचे प्रभारी वनपरिक्षेत्र अधिकारी संतोष कंक,विशाल चव्हाण,राजीव फराटे पाटील,ग्रामपंचायत सदस्य सागर फराटे,संपत फराटे,बाळासाहेब फराटे,विलास टेंभेकर,समाधान टेंभेकर,शुभम मचाले,माऊली जगताप आदी उपस्थित होते.
01749
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

