पाचर्णे यांच्या विचाराने काम करणार : कटके

पाचर्णे यांच्या विचाराने 
काम करणार : कटके
Published on

आंधळगाव, ता. २९ : ‘‘सर्वसामान्य मायबाप जनतेने निवडणूक हातात घेतल्याने तब्बल ७५ हजारांच्या मताधिक्याने माझा विजय झाला आहे. मतदारांच्या या विश्वासाला तडा जाऊ दिला जाणार नाही. शिरूर तालुक्याला माजी आमदार स्व. बाबूराव पाचर्णे यांच्या चांगल्या विचारांचा मोठा वारसा लाभला आहे. यापुढील काळात त्यांचे विचार डोळ्यासमोर ठेवून काम केले जाईल. विधानसभा निवडणुकीत माझा झालेला विजय त्यांना समर्पित करतो,’’ असे प्रतिपादन शिरूर- हवेलीचे नवनिर्वाचित आमदार ज्ञानेश्वर कटके यांनी केले.
शिरूर तालुक्यातील गणेगाव दुमाला येथे आभार दौऱ्यात ते बोलत होते. शिरूर तालुक्याच्या पूर्व भागातील नागरगाव, आंधळगाव, कुरुळी, सादलगाव, बाभुळसर बुद्रुक, गणेगाव दुमाला, तांदळी, मांडवगण फराटा आदी गावांना भेटी देत त्यांनी नागरिकांच्या शुभेच्छा स्वीकारल्या. नागरगाव व आंधळगाव येथे घोड्यावर मिरवणूक काढत ग्रामस्थांनी त्यांचे स्वागत केले.
कटके म्हणाले, ‘‘शिरूर तालुक्याच्या पूर्व भागातील शेतकऱ्यांच्या उसाच्या तोडणीचे योग्य नियोजन केले जाईल. निवडणुकीत माझ्याबाबत विरोधकांनी चुकीचा प्रचार केला, मात्र तालुक्यातील सुज्ञ मतदारांनी विश्वास दाखवून दिला. त्यामुळे माझा विजय सुकर झाला. शेती, पाणी, रस्ता, विद्युत रोहित्र आदीसह अन्य प्रश्न सोडवले जातील. मी एकटा आमदार नसून तालुक्यातील प्रत्येक व्यक्ती हा आमदार असणार आहे. न्हावरे येथे लवकरच कार्यालय सुरु करणार आहे. मांडवगण वडगाव जिल्हा परिषद गटाने सात हजारांहून अधिकचे मताधिक्य दिले आहे.त्यामुळे तालुक्यातील शेवटच्या गावालासुद्धा निधी देण्याला प्रथम प्राधान्य दिले जाईल. गणेगाव दुमाला येथील भीमा नदीवर पूल बांधण्यासाठी प्रयत्नशील आहे.’’
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष रवी काळे, सुधीर फराटे, राहुल पाचर्णे, महेश ढमढेरे, सागर फराटे, अण्णा महाडीक, तुकाराम निंबाळकर, चाचा जाधवराव, सुनील कटके, गणेश घोलप, रामभाऊ कदम, पोपट निंबाळकर, मयूर ओस्तवाल आदी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com