

आंधळगाव, ता.७ : पिंपळसुटी (ता. शिरूर) येथे वनविभागाने लावलेल्या पिंजऱ्यात बिबट्या जेरबंद झाल्याची घटना मंगळवारी(ता.७)पहाटेच्या सुमारास घडली. पिंपळसुटी(ता.शिरूर)येथील बारवकर वस्ती येथे राहत असलेले अंकुश फलके यांच्या शेतात वनविभागाच्या वतीने पिंजरा लावला होता व मंगळवारी पहाटेच्या सुमारास भक्ष्याच्या शोधात असलेला बिबट्या पिंजऱ्यात अडकला. दरम्यान, बिबट्या जेरबंद झाल्याची माहिती मिळताच वनविभागाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने वन परीक्षेत्र अधिकारी विकास भोसले, वनरक्षक गणेश डोईफोडे, सुधीर शितोळे, शरीफ शेख, अमोल पाटोळे, रोहिदास शेंडगे यांनी पकडलेल्या बिबट्याला बिबट निवारण केंद्रात सोडले आहे.
01885
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.