आंधळगावात हायवा उलटून कुंपणाचे नुकसान

आंधळगावात हायवा उलटून कुंपणाचे नुकसान

Published on

आंधळगाव, ता. १२ : चालकाला वळणाचा अंदाज न आल्याने खडी घेऊन जाणारा भरधाव हायवा रस्त्यालगत असणाऱ्या घराच्या संरक्षक तारेच्या कुंपणावर जाऊन उलटला. ही घटना बुधवारी (ता. १२) दुपारी १२ वाजण्याच्या दरम्यान आंधळगाव येथे घडली. त्यात कुठलीही जीवितहानी झाली नाही, मात्र घराच्या भोवती असणाऱ्या लोखंडी तारेच्या कुंपणाचे किरकोळ नुकसान झाले.
शिरूर तालुक्याच्या पूर्व भागातून आंधळगाव- तांदळी हा जिल्हा मार्ग गेला आहे. या रस्त्यावर रात्रंदिवस मोठ्या प्रमाणात वाहतूक सुरु असते. हायवा (क्र. एम.एच १२ वी.एफ. ४४७२) बुधवारी दुपारी १२ वाजता रस्त्याच्या कामासाठी खडी घेऊन कुरुळी बाजूकडे जात होता. आंधळगाव जवळ आल्यावर वळण असल्याचे चालकाच्या अचानक लक्षात आले. त्यामुळे चालकाने हायवाचे ब्रेक जोरात दाबून हायवावर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न केला, मात्र भरधाव हायवा थेट रस्त्यालगतच्या घराच्या लोखंडी तारेचे कुंपण तोडत जागेवर उलटला. या घटनेत चालकाला किरकोळ दुखापत झाली असून, हायवाचे नुकसान झाले आहे.

रस्त्यावरील खड्डे अपघाताला कारणीभूत
आंधळगाव परिसरातील रस्त्याचे काम दोन वर्षांपूर्वी झाले आहे. सध्या या रस्त्यावर ठिकठिकाणी मोठ्या प्रमाणात पडलेले खड्डे अपघाताला निमंत्रण देणारे ठरत आहेत. रस्त्यावरील खड्डे चुकविण्याच्या प्रयत्नात अनेकदा छोटे- मोठे अपघात होत आहेत. त्यामुळे संबंधित विभागाने त्वरित बुजवून टाकावेत, अशी मागणी नागरिक करत आहेत.

आंधळगाव गावच्या प्रवेशद्वाराजवळ रस्त्यावर धोकादायक खड्डे पडले आहेत.त्यामुळे खड्डे चुकविण्याच्या प्रयत्नात अपघात होत आहेत तसेच रात्रीच्या वेळी खड्डे लक्षात येत नसल्याने वाहनांचे खड्ड्यात आपटून नुकसान होत आहे. संबंधित विभागाने त्वरित हे खड्डे बुजवून टाकावेत.
- राजेंद्र भोसले, ग्रामस्थ, आंधळगाव (ता. शिरूर)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com