वाघेश्वर प्रशालेत स्टेम लर्निंग सेंटर सुरू

वाघेश्वर प्रशालेत स्टेम लर्निंग सेंटर सुरू
Published on

मांडवगण फराटा, ता. १८ : ‘‘विज्ञान, गणित यांसारख्या अवघड विषयातील संकल्पना स्पष्ट होण्यासाठी विद्यार्थ्यांना स्टेम लॅबची मदत होईल. शिक्षकांनी विद्यार्थ्यांना आठवड्यातून किमान एकदा या लॅबमध्ये नेऊन विविध संकल्पना समजून घेण्यासाठी मदत करावी. प्राथमिक संकल्पना स्पष्ट झाल्यास विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी नक्कीच मदत होईल.’’ असे प्रतिपादन शिरूर शिक्षण प्रसारक मंडळाचे संचालक प्रकाश बाफणा यांनी केले.

मुंबई येथील ‘नॉर्दन ट्रस्ट’ व ‘चाइल्ड राईट्स अॅन्ड यू’ क्राय संस्थेच्या माध्यमातून मांडवगण फराटा (ता. शिरूर) येथील श्री वाघेश्वर विद्याधाम प्रशालेमध्ये ७ लाख ५० हजार रुपये खर्चून स्टेम लर्निंग सेंटर चालू केले आहे. या सेंटरच्या उद्‍घाटनप्रसंगी अध्यक्षस्थानावरून बाफणा बोलत होते.
यामध्ये विज्ञान, गणित, भूमिती, भूगोल या विषयांवरील ६९ प्रकारची उपकरणे ठेवली आहेत. त्याचबरोबर वर्गामध्ये नेता येतील अशी छोटी-छोटी उपकरणे ही ठेवली आहेत.
याप्रसंगी शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सुधीर फराटे, शिरूर शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव नंदकुमार निकम, मुख्याध्यापक रामदास चव्हाण, नॉर्दन ट्रस्टचे मनीष राठी, ज्योती राठोड, विराज पाटील, क्राय संस्थेचे राजेंद्र काळे यांची भाषणे झाली. यावेळी शालेय व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष कालिदास चकोर, उपसरपंच अमोल शितोळे, पालक संघाचे उपाध्यक्ष सुधाकर जगताप, शीतल फरगडे, प्रिया टाटिया, युवराज जगताप, जालिंदर कुंजीर, परशुराम राठोड, नवनाथ जाधव, नारायण साळवे, पर्यवेक्षक संपदा वेताळ, गौतम जैन, रोहित तिवारी, अनिल जाधव, हरिदास उबाळे, संदीप शेलार, मीरा राठोड आदी उपस्थित होते. उपमुख्याध्यापक गणपत बोत्रे यांनी सूत्रसंचालन तर मुख्याध्यापक रामदास चव्हाण यांनी आभार मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com