तलावात बुडून मेंढपाळाचा मृत्यू

तलावात बुडून मेंढपाळाचा मृत्यू
Published on

आंधळगाव, ता.३०: पाझर तलावात बकरी धूत असताना ३० वर्षीय मेंढपाळ तरुणाचा बुडून मृत्यू झाला. साहेबराव चांगदेव पांढरे (वय ३०,रा.आंधळगाव,ता.शिरूर) असे मृत तरुणाचे नाव आहे. या घटनेबाबत दादा सखाराम पांढरे (रा.आंधळगाव ता. शिरूर) यांनी मांडवगण फराटा पोलिस ठाण्यात खबर दिली. मिळालेल्या माहितीनुसार रविवारी (ता.३०) दुपारी दोनच्या सुमारास आंधळगाव (ता.शिरूर) येथील दादा सखाराम पांढरे, मयत साहेबराव आणि अण्णा सखाराम पांढरे हे तिघे पाझर तलावावर बकरी धुण्यासाठी गेले होते. बकऱ्या धूत असताना साहेबराव अचानक पाण्यात बुडाला. त्यांना वाचवण्यासाठी फिर्यादी दादा पांढरे आणि त्यांचे बंधू यांनी तलावात उड्या मारला.
या शोध घेण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांना यश आले नाही. त्यांनी सतीश ठोंबरे यांना माहिती दिली. त्यानंतर ठोंबरे यांनी तलावात शोध घेत अखेर साहेबराव यांचा मृतदेह बाहेर काढला. त्यानंतर साहेबराव यांना न्हावरे येथील ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले. मात्र उपचारापूर्वीच डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

02044

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com