न्हावरे-बीड महामार्ग अपघाताचा हॉटस्पॉट

न्हावरे-बीड महामार्ग अपघाताचा हॉटस्पॉट

Published on

आंधळगाव, ता.२४: न्हावरे-बीड हा महामार्ग दिवसेंदिवस अपघाताचा हॉटस्पॉट ठरत आहे. अपघात रोखण्यासाठी येथे त्वरित योग्य त्या उपाययोजना कराव्यात, अशी मागणी लेखी पत्राद्वारे निर्वी ग्रामपंचायतीने देशाचे रस्ते व वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांच्याकडे केली आहे. अहिल्यानगर येथे गुरुवारी (ता.२२) माजी सरपंच तात्यासाहेब सोनवणे, उपसरपंच अनिल कांबळे,शरद पवार यांनी ग्रामपंचायतच्या वतीने राष्ट्रीय महामार्गाच्या अधिकाऱ्यांना निवेदन दिले.
निवेदनात म्हटले आहे, निर्वी गावातून न्हावरे-बीड ५४८ डी हा राष्ट्रीय महामार्ग गेला आहे.या महामार्गावर अनेक ठिकाणी धोकादायक वळणे असून, पथदिवे, दिशादर्शक फलक, गतिरोधक, सूचनाफलक, संरक्षक कठडे, अशी अनेक कामे प्रलंबित असल्याने या रस्त्यावर वारंवार अपघात होत आहेत. शिरसगाव काटा बाजूने निर्वीकडे येणारी वाहने भरधाव वेगाने येतात.निर्वी गावाजवळ धोकादायक वळण असल्याने दोन्ही बाजूने येणाऱ्या वाहन चालकांना एकमेकांचा अंदाज येत नाहीत. त्यामुळे भरधाव वाहने श्रावण कांबळे यांच्या घरावर येऊन आदळत आहेत. मागील महिन्यात कांबळे यांच्या घराला भरधाव वाहने धडकून तीन अपघात झाले आहेत. तर वेग नियंत्रित न झाल्याने काही वाहने संरक्षण कठड्याला येऊन धडकली आहेत. त्यामुळे या वळणावर वारंवार अपघात होत आहेत. धोकादायक वळण असलेल्या ठिकाणी संरक्षण भिंत बांधण्यात येऊन त्या ठिकाणी स्ट्रीटलाईट बसवावी. महामार्गावर ठिकठिकाणी सूचनाफलक, सोलरवर स्पीड ब्रेकर, दिशादर्शक फलक, रेडियम लावावेत, आदी मागण्या राष्ट्रीय महामार्गाच्या अधिकाऱ्यांनी आश्वासित केल्याचे माजी सरपंच तात्यासाहेब सोनवणे यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com