सहकाराचे संवर्धन करणे सर्वांची जबाबदारी
मांडवगण फराटा, ता.१ : ‘‘सहकार महर्षी शिवाजीराव नागवडे सहकारी साखर कारखान्यामुळे श्रीगोंदा तालुक्याचा कायापालट झाला आहे. या सहकार गंगोत्रीचे संरक्षण व संवर्धन करणे ही सर्वांची जबाबदारी आहे. गळीत हंगाम यशस्वी करण्यासाठी सभासद व ऊस उत्पादक शेतकरी व कामगार यांनी सहकार्य करावे,’’ असे आवाहन नागवडे कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र नागवडे यांनी केले.
सहकार महर्षी शिवाजीराव नागवडे सहकारी साखर कारखान्याच्या सन २०२५-२६ या ५१ व्या गळीत हंगामाच्या पूर्वतयारीचा एक भाग म्हणून मिल रोलर पूजन अध्यक्ष राजेंद्र नागवडे, संचालक सावता हिरवे व प्रवीण लबडे यांच्या हस्ते करण्यात आला त्यावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी कारखान्याचे उपाध्यक्ष बाबासाहेब भोस होते.
यावेळी बोलताना नागवडे म्हणाले की, खासगी कारखान्यांशी स्पर्धा करत असताना आज सहकारी साखर कारखानदारीसमोर अनेक आव्हाने उभे आहेत. दिवसेंदिवस खर्च वाढत आहे. मात्र, गाळप हंगामाचे दिवस कमी होत आहेत. पूर्वी १७० ते १९० दिवसांपर्यंत गाळप हंगाम चालत होता. आता ११० ते १२० दिवसापर्यंत खाली आलेला आहे.त्यामुळे कारखान्याचे आर्थिक संतुलन राखणे अत्यंत कठीण झाले आहे.
यावेळी भोस म्हणाले की, स्वर्गीय बापूंचा विचार आणि वारसा घेऊन राजेंद्रदादा नागवडे यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व संचालक एक दिलाने काम करून जिल्ह्यात अग्रेसर ऊस भाव देण्यासाठी प्रयत्नशील आहे.
यावेळी संचालक श्रीनिवास घाटगे, राकेश पाचपुते, प्रशांत दरेकर, योगेश भोईटे, डी.आर.काकडे, प्रा.सुरेश रसाळ, बंडू जगताप, संदीप औटी, दत्तात्रेय कातोरे यांच्यासह सरपंच प्रवीण शिर्के, प्रा.भगवान शिर्के, कार्यकारी संचालक प्रवीण शिंदे यांच्यासह कारखान्याचे सर्व खाते प्रमुख कामगार व सभासद उपस्थित होते. यावेळी भाऊसाहेब पडळकर, हनुमंत काळे व उत्तम दरेकर यांचा सेवानिवृत्तीनिमित्त सत्कार करण्यात आला. प्रास्ताविक संचालक भाऊसाहेब नेटके यांनी केले तर शरद जगताप यांनी आभार व्यक्त केले.
श्रीगोंदा : फॅक्टरी रोलर पुजन करताना अध्यक्ष राजेंद्र नागवडे
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.