पुणे
आंधळगावात विद्यार्थ्यांना खाऊचे वाटप
आंधळगाव, ता. १ : आंधळगाव (ता. शिरूर) येथील लोकशाहीर अण्णा भाऊ साठे युवा मंच मित्र मंडळाच्या वतीने अण्णा भाऊ साठे यांची जयंती साजरी करण्यात आली. येथील अंगणवाडी, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा याठिकाणी मंडळाच्या वतीने विद्यार्थ्यांना खाऊचे वाटप केले. यावेळी चंद्रकांत कुसेकर, रामचंद्र कोळेकर, विजय कुसेकर, विठ्ठल नलगे, संतोष सरोदे, संतोष पाटोळे, पांडुरंग सरोदे, सदाशिव पाटोळे, संदीप दिवेकर, रवींद्र सरोदे, रोहिदास पाटोळे, श्रीकांत पाटोळे, नामदेव पाटोळे, विनोद सरोदे, प्रतीक चव्हाण, घनश्याम कुसेकर, प्रणेश सरोदे, प्रदीप सरोदे, अजय पाटोळे, प्रतीक चव्हाण, नवनाथ सरोदे, सुधीर सरोदे, तेजस जगदाळे, अमोल थोरात आदी उपस्थित होते.