कुरुळीच्या अध्यक्षपदी हजराबी जखाते
आंधळगाव, ता. २९ : कुरुळी (ता. शिरूर) येथील विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेच्या अध्यक्षपदी हजराबी जखाते आणि उपाध्यक्षपदी अरुणा बोरकर यांची बिनविरोध निवड करण्यात आली. माजी अध्यक्ष कल्पना बोरकर व माजी उपाध्यक्ष बापूराव बोरकर यांनी आपल्या पदांचे राजीनामे दिले होते.
त्यामुळे रिक्तपदाच्या निवडीसाठी सोमवारी (ता. २४) बैठकीचे आयोजन केले होते. अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदासाठी अनुक्रमे जखाते व बोरकर यांचे एकमेव अर्ज आल्याने त्यांची बिनविरोध निवड झाल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी एस. एच. धायगुडे यांनी घोषित केले. संस्थेचे सचिव सौरभ नागवडे यांनी निवडणूक प्रक्रियेत सहकार्य केले. यावेळी पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे माजी विभागीय अधिकारी नानासाहेब खळदकर, माजी सरपंच बी.आर बोरकर, माजी सरपंच रायबा बोरकर, तंटामुक्त समितीचे माजी अध्यक्ष राजेंद्र बोरकर, माजी उपसरपंच रणजित बोरकर, उद्योजक नामदेव बोरकर, तात्या खांडेकर, सुमीत बोरकर, रफिक जखाते आदी उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

