‘खो-खो’त वडगाव रासाईच्या मुलांसह मुलींची बाजी
आंधळगाव, ता. २१ : फुलगाव (ता. हवेली) येथे मंगळवारी (ता. २०) रोजी पार पडलेल्या यशवंतराव चव्हाण जिल्हास्तरीय कला-क्रीडा स्पर्धेत शिरूर तालुक्यातील वडगाव रासाई शाळेच्या लहान गटातील मुले व मुली यांनी खो-खो स्पर्धेत जिल्ह्यात प्रथम क्रमांक पटकावत घवघवीत यश संपादन केले. एकाच स्पर्धेत मुला-मुलींचे दुहेरी विजेतेपद ही बाब विशेष ठरली आहे.
लहान गट मुले खो-खो स्पर्धेत वडगाव रासाई शाळेच्या संघाने अत्यंत चुरशीच्या सामन्यात हवेली तालुक्याच्या बलाढ्य संघावर मात केली. त्याचप्रमाणे लहान गट मुली खो-खो स्पर्धेतही वडगाव रासाईच्या संघाने दमदार कामगिरी करत प्रतिस्पर्धी संघांना संधी न देता प्रथम क्रमांक पटकावला.
शाळेचे मुख्याध्यापक दत्तात्रय ठोंबरे यांच्या नेतृत्वाखाली शिक्षकवर्गाने विद्यार्थ्यांना सातत्याने सराव करून घेतला. वडगाव रासाईचे केंद्रप्रमुख दगडू वेताळ, न्हावरे बीटचे विस्तार अधिकारी सुनार्थ पवार, शिरूर तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी बाळकृष्ण कळमकर यांचे मार्गदर्शनही खेळाडूंना लाभले. शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष वीरेंद्र ढवळे, उपाध्यक्ष वैशाली चांदगुडे व सदस्य, माता-विद्यार्थी संघाचे अध्यक्ष व समिती यांनी आवश्यक सुविधा व प्रेरणा देत विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढवला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

