अपप्रचाराऐवजी विकासकामांवर बोला ः सुजाता पवार

अपप्रचाराऐवजी विकासकामांवर बोला ः सुजाता पवार

Published on

मांडवगण फराटा, ता. २५: ‘‘निवडणूक कोणतीही असो, विरोधकांकडून प्रत्येक वेळी कारखान्याच्या मुद्द्यावरूनच सातत्याने टीका केली जाते. मात्र विकासकामे करताना आपण कधीही पक्ष किंवा गट पाहिलेला नाही,’’ असा ठाम दावा राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार सुजाता पवार यांनी केला.
रविवारी (ता. २५) सादलगाव, तांदळी, गणेगाव दुमाला, बाभूळसर बुद्रुक, नागरगाव येथील वाड्यावस्त्यांवर जाऊन जिल्हा परिषदेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार सुजाता पवार तसेच वडगाव पंचायत समिती गणातून विकास शेलार व मांडवगण फराटा पंचायत समिती गणातून संगीता फराटे यांच्या प्रचारार्थ घेण्यात आलेल्या घोंगडी सभांमध्ये त्या बोलत होत्या.
सुजाता पवार म्हणाल्या, ‘‘विकासकामे करताना सर्वसामान्य नागरिकांचे हित डोळ्यासमोर ठेवूनच काम करण्यात आले आहे. मात्र विरोधक विकासकामांवर बोलण्याऐवजी अपप्रचाराचा मार्ग स्वीकारत आहेत. आपल्या कार्यकाळात परिसराला भरघोस निधी मिळाल्याने निधीबाबत वेगळे काही सांगण्याची गरज नाही. केलेली कामेच याची साक्ष देतात.’’
विरोधक व्यक्तिद्वेषातून सातत्याने टीका करत असल्याचा आरोप करत त्या म्हणाल्या की, मागील काळात केलेल्या विकासकामांची हीच पोचपावती असून मतदारांनी दाखवलेल्या विश्वासामुळेच पुन्हा उमेदवारी मिळाली आहे. विकासाच्या मुद्द्यावरच ही निवडणूक लढवली जाणार आहे.
कोविड-१९ च्या कठीण काळात सुजाता पवार यांनी कोविड सेंटर उभे करून गोरगरीब जनतेसाठी मोलाची सेवा केली. त्या काळात आरोग्य सुविधा उपलब्ध करून देत अनेक कुटुंबांना दिलासा मिळवून दिल्याने त्यांचे ऋण फेडण्याचे काम मतदारांनी केले पाहिजे, अशी भावना घोडगंगा सहकारी साखर कारखान्याचे संचालक उमेश साठे यांनी व्यक्त केली.
घोडगंगा कारखान्याचे माजी संचालक कांतीलाल होळकर म्हणाले, ‘‘जिल्हा परिषद गटाचा एकूण चेहरामोहरा बदलण्याचे काम जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन समितीच्या माजी सभापती सुजाता पवार यांच्या माध्यमातून झाले आहे. गावागावांत बंदिस्त गटार वाहिनी, अंगणवाडी इमारती, संरक्षक भिंती, सभा मंडप यांसारखी अनेक विकासकामे त्यांच्या पाठपुराव्यामुळे झाली आहेत. या कामांमुळे अनेक गावांतील नागरिकांना मूलभूत सुविधा मिळाल्या असून ग्रामीण विकासाला चालना मिळाली आहे.’’

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com