शोकसभेत आठवणींच्या भावनांचा फुटला बांध
आंधळगाव, ता.२९ : वडगाव रासाई (ता.शिरूर) येथे उपमुख्यमंत्री व पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांना आदरांजली वाहण्यासाठी गुरुवारी (ता.२९) शोकसभा पार पडली. दादांच्या आठवणींना उजाळा देताना तरुण, ज्येष्ठ नागरिक व उपस्थित सर्वच नागरिक भावुक झाले. यावेळी शोकसभेत आठवणींच्या भावनांचा बांध फुटला.
माजी सरपंच उद्धव शेलार म्हणाले, ‘‘मांडवगण फराटा परिसरातील दादांचा दौरा आजही आठवतो. सरपंचपदावर नवखा असतानाच माजी आमदार अशोक पवार यांचा फोन आला ‘अजितदादा गावात येत आहेत, स्वागताची जबाबदारी तुमची.’ दादा आल्यानंतर मी लांबच उभा होतो; मात्र त्यांनीच ‘या गावचा सरपंच कोण?’अशी विचारणा करून मला जवळ बोलावले. विकासकामांबाबतची त्यांची बारकाईची माहिती आणि आपुलकीचा सल्ला आजही मनात कोरला आहे. अशा लढाऊ नेत्याला गमावल्याचे शल्य कायम बोचत राहील.’’
श्रीराम सोसायटीचे अध्यक्ष सचिन पवार यांनी सांगितले, की शेतकऱ्यांना शून्य टक्के व्याजाने कर्ज देण्याचा ऐतिहासिक निर्णय दादांनी पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या माध्यमातून घेतला.त्याचा आदर्श पुढे राज्यभर स्वीकारला गेला. पहाटेपासून रात्रीपर्यंत अखंड काम करणारा, शिस्तप्रिय व कणखर नेता म्हणून दादांची ओळख होती.
काकासाहेब खळदकर म्हणाले, की दादांचा वक्तशीरपणा आणि काम करताना पक्षभेद न पाहण्याची भूमिका फार भावायची. त्यांच्या अकाली निधनाने मोठा धक्का बसला. दादांसारखा नेता पुन्हा होणे कठीण आहे.”
यावेळी बाळासाहेब पवार, सुरेश ढवळे, कुंडलिक शितोळे, बंडू शेलार, डॉ.श्रीकांत झंवर, डॉ.पांडुरंग बाणखेले, सुजित शेलार, पोपट चव्हाण, भुजंग शेलार आदींनीही आपल्या भावना व्यक्त केल्या. यावेळी बंडू शेलार, शिवाजी शेलार, संतोष पाचंगे, वीरेंद्र ढवळे, आदिनाथ पापळ, मंगेश ढवळे, रामजी शेलार आदी उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

