‘सुजाता पवार यांच्या नेतृत्वाखाली मांडवगणचा विकास’
मांडवगण फराटा, ता. १ : ‘‘मांडवगण फराटा (ता. शिरूर) गावाच्या विकासाचा इतिहास जेव्हा लिहिला जाईल, तेव्हा त्यात माजी सभापती सुजाता पवार यांचे नाव सुवर्णाक्षरांनी कोरले जाईल. शब्दांपेक्षा कृतीवर विश्वास ठेवणाऱ्या पवार यांनी गावासाठी कोटीवधी रुपयांचा निधी खेचून आणत विकासाची चक्रे वेगाने फिरवली,’’ असे मत माजी सरपंच शिवाजी कदम यांनी व्यक्त केले.
मांडवगण फराटा येथे रविवारी (ता. १) जिल्हा परिषदेच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार सुजाता पवार आणि पंचायत समितीच्या उमेदवार संगीता फराटे यांनी घरोघरी जाऊन थेट मतदारांशी संवाद साधत आपल्या विकासकामांचा हिशोब जनतेसमोर मांडला. त्यावेळी शिवाजी कदम बोलत होते. यावेळी प्रतिभा बोत्रे म्हणाल्या, ‘‘माऊली मंदिर ते वरदविनायक हॉस्पिटल या रस्त्यासाठी पाच कोटी रुपयांचा निधी आणून सुजाता पवार यांनी केवळ रस्ता दिला नसूनस गावच्या वैभवात मोठी भर घातली आहे. तसेच, कोरोना काळात त्यांनी केलेली मदत येथील नागरिक कधीही विसरणार नाहीत.’’
दत्तात्रेय फराटे म्हणाले, ‘‘सुजाता पवार यांच्या दूरदृष्टी आणि नियोजनामुळे येथील स्मशानभूमीचा कायापालट होऊन ती नंदनवनासारखी विकसित केली आहे. देशाचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनीही त्यांच्या कार्याचे जाहीरपणे कौतुक केले आहे. कल्पकतेच्या जोरावर त्यांनी संपूर्ण जिल्हा परिषद गटाची ओळख बदलली आहे. हे वास्तव कोणीही नाकारू शकत नाही.’’
संभाजी फराटे म्हणाले, ‘‘प्राथमिक आरोग्य केंद्र, पशुवैद्यकीय दवाखाना, सुसज्ज स्मशानभूमी, व्यापारी गाळे अशी मूलभूत आणि अत्यावश्यक कामे सुजाता पवार यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे प्रत्यक्षात उतरली आहेत. त्यामुळे मांडवगण फराटा गाव आज मागे नाही, तर विकासाच्या पहिल्या रांगेत उभा आहे, हेच निर्विवाद सत्य आहे.’’
लतिका जगताप म्हणाल्या, ‘‘जिल्हा परिषद गटात सुजाता पवार यांनी विशेषतः महिलांसाठी भरीव निधी उपलब्ध करून दिला आहे. महिलांच्या सक्षमीकरणासाठी केलेले हे काम उल्लेखनीय असून, त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहून त्यांना जिल्हा परिषदेत सदस्य म्हणून पाठवणे, ही काळाची गरज आहे.’’
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

