विरोधकांकडे मांडण्यासारखे ठोस कामच नाही

विरोधकांकडे मांडण्यासारखे ठोस कामच नाही

Published on

मांडवगण फराटा, ता. ३ : ‘‘विरोधकांकडे जनतेसमोर मांडण्यासारखे एकही ठोस विकासकाम नाही. त्यामुळे ते प्रत्येक निवडणुकीत केवळ घोडगंगा साखर कारखान्याच्या मुद्द्यावरच राजकारण करत आहेत. मात्र, त्यांनी माझ्या कार्यकाळात झालेल्या तब्बल कोट्यवधी रुपयांच्या विकासकामांवर उघडपणे चर्चा करण्याची हिंमत दाखवावी,’’ असा जोरदार हल्लाबोल राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हा परिषद उमेदवार सुजाता पवार यांनी केला.
मांडवगण फराटा (ता. शिरूर) येथे मंगळवारी (ता. ३) सुजाता पवार व पंचायत समितीच्या उमेदवार संगीता फराटे यांच्या प्रचारार्थ घरोघरी भेटी देत प्रचार करण्यात आला. त्यावेळी सुजाता पवार बोलत होत्या. त्या म्हणाल्या, ‘‘अजितदादांच्या निधनानंतर पक्षाने साधा व संयमित प्रचार करण्याचे स्पष्ट आवाहन केले असतानाही काही जणांकडून ध्वनिक्षेपक लावून बेशिस्त व दिखाऊ प्रचार केला जात आहे. शोकाच्या काळातही राजकीय लाभासाठी गोंगाट करणाऱ्यांनी आधी सामाजिक भान शिकावे.’’
यावेळी घोडगंगा साखर कारखान्याचे संचालक शिवाजी गदादे म्हणाले, ‘‘सुजाता पवार यांनी केवळ आरोपांचे राजकारण न करता प्रत्यक्ष काम करून दाखवले आहे. कोरोना संकटाच्या काळात शिरूर- हवेली मतदारसंघात उभारलेल्या पाच कोविड केअर सेंटरमुळे जिल्ह्यातील हजारो गोरगरीब रुग्णांना मोफत उपचार मिळाले. संकटात पळ काढणारे कोण आणि जनतेच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले कोण, हे जनता चांगलेच ओळखते. त्यामुळे या निवडणुकीत मतपेटीतूनच विरोधकांना चोख उत्तर दिले जाईल.’’
माजी सरपंच सीमा फराटे म्हणाल्या, ‘‘सुजाता पवार यांनी आपल्या कार्यकाळात या गटात तब्बल ३५ कोटी रुपयांची विकासकामे केली आहेत. पशुपालकांना एक्स-रेसाठी दौंडला धाव घ्यावी लागत होती, पण मांडवगण फराटा येथील दवाखान्यात ५० लाखांची अत्याधुनिक एक्स-रे मशीन बसवून त्यांनी केवळ आश्वासने नव्हे; तर ठोस सुविधा दिल्या आहेत. विकास बोलतो, विरोधकांचा अपप्रचार नाही.’’

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com