

मांडवगण फराटा, ता. १९ : तांदळी (ता. शिरूर) हद्दीतील जिल्हा परिषद माळवाडी शाळेत विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी ‘धुरंधर बाल कलाविष्कार’ कार्यक्रम उत्साहात पार पडला. हा कार्यक्रम विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देणारा, तसेच सामाजिक जाणीवा रुजविणारा उपक्रम ठरला. कार्यक्रमातून एकूण ३७ हजार ४५० रुपयांचा निधी बक्षीस स्वरूपात जमा झाल्याची माहिती मुख्याध्यापक मानसिंग वाकडे यांनी दिली.
कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी सामाजिक नाटिका, देशभक्तिपर गीते, मतदार जागृती, स्वच्छ भारत अभियान यांसारख्या विषयांवर प्रभावी सादरीकरण केले. लहानग्यांच्या अभिनय, गायन आणि संवादफेकीला उपस्थितांकडून भरभरून दाद मिळाली. विशेष म्हणजे विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या लेझीम पथकाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले.
यावेळी घोडगंगा सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष सुभाषराव कळसकर, माजी पंचायत समिती सदस्य राजेंद्र गदादे, संजय कळसकर, गणेश गदादे, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष विशाल गाडे, उपाध्यक्ष नवनाथ गदादे, ज्ञानेश्वर बापूराव गदादे, विजय गदादे, अण्णासाहेब रासकर, अशोक गायकवाड, ऋषिकेश खोरे, दत्तात्रेय गदादे, कैलास गदादे, स्वाती गदादे, राणी गदादे आदी उपस्थित होते.
कार्यक्रमासाठी श्रीकृष्ण रासकर,सुनीता कुलकर्णी,शकुंतला घोरपडे यांनी विशेष प्रयत्न केले. तसेच, श्याम कराळे, गोरख कोथिंबीरे, मोहन अनोसे, ज्ञानेश्वर अडसूळ, राजेश आगलावे, पतंगराव शिंदे, शरद थोरात, माजी सभापती चंद्रकांत खैरे, आबासाहेब जाधव, उत्तम कळमकर, मुरलीधर कळसकर, अप्पा संकपाळ, भागवत कारखेले आदींची उपस्थिती लाभली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्रीकृष्ण रासकर यांनी केले, तर सूत्रसंचालन कांचन रासकर व स्मिता वाकडे यांनी केले. कार्यक्रमानिमित्त महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंतीही मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. महिला, पालक व ग्रामस्थांचा उत्स्फूर्त सहभाग कार्यक्रमाच्या यशात मोलाचा ठरला.
02838
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.