वन्यप्राण्यांची शिकार करणाऱ्याला कोठडी

वन्यप्राण्यांची शिकार करणाऱ्याला कोठडी

Published on

आंधळगाव, ता. २४ : दहिवडी (ता. शिरूर) येथे अनुसूची-१ मधील उदमांजर व कासवाची शिकार करणाऱ्या आरोपीला वन विभागाने अटक केली आहे. शिरूर न्यायालयाने आरोपीला दोन दिवसांची वनकोठडी सुनावली असून, त्याच्याकडून शिकारीचे साहित्य जप्त करण्यात आले आहे.
शिरूरच्या वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार, रविवारी (ता. २२) दहिवडी येथे सापळा रचण्यात आला. या कारवाईत लक्ष्मण सखाराम पवार (वय ३९, रा. रायगड) याला मेलेले उदमांजर, मऊ पाठीचे कासव आणि शिकारीच्या साहित्यासह रंगेहात पकडण्यात आले. आरोपी पसार होण्याच्या तयारीत असताना ही कारवाई करण्यात आल्याचे वनपरिक्षेत्र अधिकारी नीलकंठ गव्हाणे यांनी सांगितले.
या प्रकरणी वन्यजीव संरक्षण अधिनियम १९७२ च्या कलम ९, ३९ आणि ५१ अन्वये शिक्रापूर वनपरिमंडळात गुन्हा दाखल झाला आहे. हा गुन्हा अजामीनपात्र असून यात सात वर्षांपर्यंत कारावासाची तरतूद आहे. या गुन्ह्यात अन्य साथीदारांचा शोध घेण्यासाठी तपासाची व्याप्ती वाढवण्यात आली आहे.
वनसंरक्षक आशिष ठाकरे व जुन्नर विभागाचे उपवनसंरक्षक प्रशांत खाडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक वनसंरक्षक स्मिता राजहंस, शिरूरचे वनपरिक्षेत्र अधिकारी नीलकंठ गव्हाणे, शिक्रापूरच्या वनपाल गौरी हिंगणे, वनरक्षक प्रमोद पाटील, सोपान अनासुने, नारायण राठोड, गणेश झिरपे, जालिंदर सानप यांच्या पथकाने ही कारवाई केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com