तहसीलदार कार्यालयासमोर भरली शाळा

तहसीलदार कार्यालयासमोर भरली शाळा

Published on

शिरूर, ता. २५ : गणेगाव दुमाला हद्दीतील म्हसोबावाडी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना मूलभूत सुविधांपासून वंचित ठेवण्यात येत असल्याचा आरोप करत संतप्त पालक व ग्रामस्थांनी बुधवारी (ता.२५) थेट शिरूर गाठले. प्रलंबित मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी तहसीलदार कार्यालयासमोरच विद्यार्थ्यांची प्रतिकात्मक शाळा भरवून प्रशासनाला जाब विचारला व आंदोलन केले.
गणेगाव दुमाला हद्दीतील म्हसोबावाडी शाळेत सुमारे ४५ ते ५० विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. मात्र या शाळेत पिण्याच्या पाण्याची, हात धुण्याची तसेच शौचालयासाठी पाण्याची कोणतीही व्यवस्था नसल्याची तक्रार पालकांनी केली. मैदानाअभावी विद्यार्थ्यांना परिपाठ व क्रीडा उपक्रम रस्त्याच्या कडेला किंवा असुरक्षित मोकळ्या जागेत घ्यावे लागत असल्याचेही निदर्शनास आणून देण्यात आले. याबाबत तक्रार अर्ज देण्यात आला होता. त्यानंतर सहा जानेवारी २०२६ रोजी पालक व ग्रामस्थांनी पुन्हा निवेदन सादर केले. मात्र दोन महिन्यांनंतरही कोणतीही ठोस कार्यवाही न झाल्याने पालकांचा संयम सुटला.

शिरूरच्या नायब तहसीलदार स्नेहा गिरीगोसावी, पोलिस उपनिरीक्षक हणमंत नकाते व विस्तार अधिकारी रघुनाथ पवार यांनी पालकांशी चर्चा केली. संतप्त पालकांनी लेखी आश्वासनाशिवाय माघार घेणार नसल्याची भूमिका घेतली. अखेर दुपारी नायब तहसीलदार गिरीगोसावी यांनी शाळेला त्वरित पाणीपुरवठा करण्यात येईल, मैदान उपलब्ध करून दिले जाईल तसेच मैदानावरील अतिक्रमण करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई केली जाईल, असे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन स्थगित करण्यात आले.
यावेळी शिवसेना (उबाठा) पक्षाच्या शेतकरी सेनेचे तालुकाप्रमुख योगेश ओव्हाळ, शिवपाणंद रस्ते समितीचे सदस्य नंदकुमार शेलार यांनी पालकांच्या वतीने प्रशासनाशी चर्चा केली. दीपक गरुड, अमोल गरुड, हेमंत नागवडे, अक्षय केदारी, सुनील शेलार, सोमनाथ भोसले, रीना भोसले, अनिता गरुड, प्रियंका काळे, शोभा मुळीक, स्नेहा कोंडे, ज्योती निंबाळकर, सोनाली लोणारी, सारिका मुळीक आदी पालकांनी विद्यार्थ्यांसह आंदोलनात सहभाग घेतला.

02874

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com