घोडच्या उजव्या कालव्याचा भराव फोडून पाणी चोरी

घोडच्या उजव्या कालव्याचा भराव फोडून पाणी चोरी

Published on

मांडवगण फराटा, ता. ५ : शिरूर तालुक्यातील घोड धरणाच्या उजव्या कालव्यात शिरसगाव काटा व वडगाव रासाई परिसरात कालव्याचा भराव फोडून तसेच पंपाद्वारे अनधिकृतरीत्या पाणी उपसा केल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी २३ शेतकऱ्यांविरोधात शिरूर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून संबंधितांवर कडक कारवाई करण्याची मागणी घोड पाटबंधारे विभागाने केली आहे.
घोड पाटबंधारे उपविभागाचे साहाय्यक अभियंता यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की,काही शेतकऱ्यांनी कालव्याला ४ ते ६ इंच रुंदीची छिद्रे पाडून अनधिकृत बांधकाम केले व पाइपद्वारे पाणी स्वतःच्या विहिरीत वळविले. काहींनी थेट मोटारी बसवून पाणी उपसा केला.या प्रकारामुळे मोठ्या प्रमाणात पाण्याचा अपव्यय होत असून कालव्याच्या शेवटच्या (टेल)भागातील शेतकऱ्यांना आवर्तनाचे पाणी वेळेत मिळत नसल्याचे नमूद करण्यात आले आहे. कालव्याचा भराव तोडून शासकीय मालमत्तेचे नुकसान करण्यात आले असून हा प्रकार गंभीर स्वरूपाचा असल्याचे विभागाने स्पष्ट केले आहे.या कृत्यामुळे संपूर्ण सिंचन आवर्तन विस्कळीत झाले असून अधिकारी व कर्मचाऱ्यांवर मोठा ताण निर्माण झाल्याचे पत्रात नमूद आहे.संबंधितांवर शासकीय मालमत्तेचे नुकसान,पाणी चोरी व शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल करून कडक कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. या पत्राची प्रत कुकडी पाटबंधारे विभाग क्र.२, श्रीगोंदा येथील कार्यकारी अभियंत्यांनाही पाठविण्यात आली आहे.

या नावांचा उल्लेख
शिरसगाव काटा येथील किसन खैरे,सागर खैरे,अजित खैरे, सतीश जाधव,शरद हांडे,भानुदास चव्हाण, हौसिराम मोहिते, विजय काळे, तुकाराम वाबळे, चंद्रकांत मोहिते, विशाल गायकवाड, विकास वाबळे, अमित गायकवाड, ओंकार येवले, संभाजी थोरात, लक्ष्मण कोळपे, नानासाहेब कोळपे, मनोहर निंबाळकर तसेच वडगाव रासाई व मांडवगण फराटा येथील काका मचाले, शेखर मचाले, महेंद्र शिंदे, नवनाथ चव्हाण आदींचा उल्लेख आहे. तसेच भगवंत शिंदे यांनी मद्यपान करून कर्मचाऱ्यांना शिवीगाळ केल्याचाही आरोप करण्यात आला आहे.


ही प्राथमिक स्तरावर कारवाई करण्यात आली असून यापेक्षा अधिक कठोर पावले उचलण्यात येतील. कुणालाही पाणी चोरी सहन केली जाणार नाही. शेतकऱ्यांनी प्रशासनाला सहकार्य करावे, अन्यथा कायदेशीर कारवाईला सामोरे जावे लागेल.
- महेश शिंदे, साहाय्यक अभियंता, घोड पाटबंधारे विभाग

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com