चिमुकल्यांच्या कलाविष्कारांनी रंगले कळसकरवाडी शाळेचे स्नेहसंमेलन

चिमुकल्यांच्या कलाविष्कारांनी रंगले 
कळसकरवाडी शाळेचे स्नेहसंमेलन
Published on

मांडवगण फराटा, ता. ६ : तांदळी-कळसकरवाडी (ता. शिरूर) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या वार्षिक स्नेहसंमेलनात चिमुकल्यांनी विविध सांस्कृतिक सादरीकरणातून वास्तव जीवनाचे प्रभावी दर्शन घडविले. या कार्यक्रमात एकूण चाळीस हजार रुपयांचे रोख बक्षीस शाळेला मिळाले.
पहिली ते चौथीपर्यंतच्या विद्यार्थ्यांच्या सहभागाने पार पडलेल्या या कार्यक्रमाचे उद्‍घाटन घोडगंगा सहकारी साखर कारखान्याचे माजी उपाध्यक्ष प्रा. सुभाष कळसकर यांच्या हस्ते झाले. दीपप्रज्वलन व स्वागतगीताने कार्यक्रमाची सुरुवात झाली. यानंतर विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या देशभक्तीपर गीते, लोकनृत्य, लावणी, नाटिका, कोळीगीते, भारुड, एकांकिका, समूहगीत तसेच मराठी व हिंदी चित्रपट गीतांवरील नृत्यांनी उपस्थितांची दाद मिळवली. या वेळी शिक्षण विस्तार अधिकारी रघुनाथ पवार, केंद्र प्रमुख विजय गोडसे, माजी पंचायत समिती सदस्य राजेंद्र गदादे, उपसरपंच लक्ष्मण कळसकर, काळूराम खोरे, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष रवींद्र कळसकर, उपाध्यक्ष किरण पाचपुते, किरण कळसकर, अनिल कळसकर, जयदीप चौधरी, सागर कळसकर, विशाल कळसकर, जयसिंग कळसकर, केंद्र प्रमुख बाळासाहेब आसवले, शिरूर तालुका पदवीधर शिक्षक संघटनेचे अध्यक्ष कल्याण कोकाटे, शिक्षक समितीचे अध्यक्ष कैलास पडवळ आदी उपस्थित होते.
या कार्यक्रमातील विशेष आकर्षण हे छत्रपती शिवाजी महाराजांचा देखावा होता. तसेच ‘छावा’ चित्रपटातील शंभूराजे व कवी कलश यांचा जिवंत देखावा विद्यार्थ्यांनी प्रभावीपणे सादर केला. या कार्यक्रमाचे नियोजन मुख्याध्यापक मोहन आनोसे, उपक्रमशील शिक्षिका मीनाक्षी आनोसे, अश्विनी खोरे व विद्या कळसकर यांनी केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com