उरळगावमध्ये रेवड्यांवरील कुस्त्यांची परंपरा

उरळगावमध्ये रेवड्यांवरील कुस्त्यांची परंपरा

Published on

आंधळगाव, ता. ६ : उरळगाव (ता. शिरूर) येथे धुळवडीच्या निमित्ताने भरविण्यात येणाऱ्या रेवड्यांवरील कुस्त्यांची जुनी परंपरा ग्रामस्थांनी यंदाही उत्साहात जपली. सुमारे पंचवीस-तीस वर्षांपूर्वी यशवंत बांडे आणि ग्रामस्थांनी सुरू केलेल्या या आखाड्याचा वारसा आजही गावकरी जतन करत आहेत.
धुळवडीच्या दिवशी सुधीर पवार, विक्रम पाचुंदकर यांच्या हलगीच्या गजरात कुस्त्यांचा आखाडा रंगला. या आखाड्यातील कुस्त्यांना कोणतेही रोख इनाम किंवा किताब देण्याची प्रथा नसून कुस्ती झाल्यानंतर दोन्ही मल्लांना रेवड्या देऊन सन्मानित केले जाते. यंदाही गावातील मल्लांनी उत्स्फूर्त सहभाग घेत प्रेक्षणीय कुस्त्या सादर केल्या.
होळीच्या दुसऱ्या दिवशी होळीची राख आणि शेतातील बांधावरील माती पाण्यात मिसळून धुळवड खेळण्याची पारंपरिक पद्धत ग्रामस्थांनी उत्साहात साजरी केली. सायंकाळी साडेपाच वाजता हनुमान मंदिरात श्रीफळ वाढवून हलगी वादनाच्या गजरात ग्रामस्थ वाजतगाजत आखाड्याच्या ठिकाणी पोहोचले.
जिल्हा परिषद शाळेच्या प्रांगणात हा धुळवडीचा आखाडा पार पडला. उरळगावला कुस्तीची समृद्ध परंपरा असून अनेक नामांकित मल्ल या गावात घडले आहेत. त्यामुळे घरच्या मैदानावर रेवड्यांवर कुस्ती करण्याची संधी स्थानिक मल्लांसाठी पर्वणी ठरली. या उपक्रमासाठी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते जयवंत आप्पा गिरमकर, तुकाराम गिरमकर, शेखलाल चाचा, कैलास सात्रस, डॉ. रामदास पंदरकर, रोहिदास सात्रस, दुर्गा पाचुंदकर, सोमनाथ सात्रस, तुकाराम महाराज गिरमकर, संजय जांभळकर व राजाराम आफळे यांनी पुढाकार घेतला. तसेच अनिल बांडे, राजेंद्र रावसाहेब गिरमकर, मेजर संतोष आफळे, बापू पाचुंदकर, शरद गिरमकर, भाऊसाहेब कोकडे, नीलेश सात्रस, समशेर शेख, कैलास ओव्हाळ, कदीर शेख, जालिंदर यादव, प्रवीण धुमाळ यांनी सहकार्य केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com