कोळगाव डोळस येथून महिलेचे गंठण लंपास
आंधळगाव, ता. ८ : शिरूर तालुक्यातील कोळगाव डोळस येथे घरात एकट्या असलेल्या ज्येष्ठ महिलेचे सुमारे ५० हजार रुपये किमतीचे सोन्याचे गंठण अज्ञात चोरट्यांनी लंपास केले. ही घटना शनिवारी (ता.७) दुपारी दीड ते तीन वाजण्याच्या दरम्यान घडली. याप्रकरणी शिरूर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ठकूबाई बिरा कोळपे (वय ७५,रा. कोळगाव डोळस, ता.शिरूर) या दुपारी घरात एकट्याच होत्या. त्या वेळी दोन अज्ञात इसम त्यांच्या घराजवळ आले व काही वेळ त्यांच्याशी बोलून तेथून निघून गेले. त्यानंतर ठकूबाई कोळपे यांनी गळ्यातील सुमारे एक तोळा वजनाचे पानफुल मिनी गंठण काढून ठेवले होते. काही वेळाने ते जागेवरून गायब झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. दरम्यान, शंकर बाबूराव कोळपे हे कामानिमित्त बाहेरून घरी आल्यानंतर घरात शोध घेतला असता सोन्याचे गंठण मिळून आले नाही. त्यामुळे घराजवळ आलेल्या दोन अज्ञात इसमांनीच ते चोरून नेल्याचा संशय व्यक्त केला आहे. याप्रकरणी शंकर बाबूराव कोळपे (रा.कोळगाव डोळस,ता.शिरूर) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून दोन अज्ञात इसमांविरुद्ध शिरूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

