बॅनरवर फोटो न लावल्याने
मांडवगण फराटात गोळीबार

बॅनरवर फोटो न लावल्याने मांडवगण फराटात गोळीबार

Published on

मांडवगण फराटा, ता. २० : शिरूर तालुक्यातील मांडवगण फराटा येथे क्रिकेट स्पर्धेदरम्यान बॅनरवर फोटो लावण्याच्या वादातून थेट गोळीबाराची घटना घडल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. ही घटना गुरुवारी (ता. १९) सायंकाळी ७ वाजता घडली.
या प्रकरणी मिथुन उर्फ अमोल आनंदा चौगुले (वय ३१, रा. मांडवगण फराटा) यांनी शिरूर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार सूत्रधार शिंदे, पप्पू कड, ऋतिक चव्हाण, योगेश मचाले, मिनीनाथ गव्हाणे, दिगंबर शेंडकर व ४ ते ५ अनोळखी व्यक्तींविरुद्ध (सर्व रा. मांडवगण फराटा) गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मांडवगण फराटा येथील भैरवनाथ क्रिकेट मैदान येथे क्रिकेट स्पर्धेच्या बॅनरवर सुत्रधार शिंदे याचा फोटो न लावल्याच्या कारणावरून वाद निर्माण झाला होता. हा वाद मिटवण्यासाठी योगेश मचाले व मिनीनाथ गव्हाणे यांनी बोलावल्याने फिर्यादी आपल्या मित्रांसह मैदानावर गेले होते. दरम्यान, तेथे उपस्थित असलेल्या अक्षय पाटील व पप्पू कड यांनी फिर्यादीशी वाद घातला. त्यात पप्पू कड याने त्याच्याकडे असलेल्या पिस्तुलातून फिर्यादीवर जीव घेण्याच्या उद्देशाने गोळीबार केला. यानंतर फिर्यादी व त्यांचे साथीदार जीव वाचवण्यासाठी पळत असताना सूत्रधार शिंदे, ऋतिक चव्हाण, योगेश मचाले, दिगंबर शेंडकर व इतर अनोळखींनी त्यांच्यावर दगडफेक करत शिवीगाळ केली. या प्रकरणी शिरूर पोलिस ठाण्यात विविध कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक चव्हाण करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com