आंधळगावला पिंजऱ्यात 
अखेर बिबट्या जेरबंद

आंधळगावला पिंजऱ्यात अखेर बिबट्या जेरबंद

Published on

आंधळगाव, ता. २३ : आंधळगाव (ता. शिरूर) येथील नलगेवस्ती परिसरात माणिक कुसेकर यांच्या शेतात वन विभागाने लावलेल्या पिंजऱ्यात सोमवारी (ता. २३) पहाटे बिबट्या जेरबंद झाला.
या परिसरात काही दिवसांपूर्वी पाळीव प्राण्यांवर हल्ले झाले होते. तसेच, दोन कुत्र्यांचा बिबट्याने बळी घेतल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. नलगेवस्ती येथे बिबट्या दिसल्याची माहिती शेतकरी सचिन माणिक कुसेकर यांनी वन विभागाला दिली होती. त्यानंतर शिरूर वनपरिक्षेत्र अधिकारी नीलकंठ गव्हाणे यांनी तातडीने पिंजरा लावण्याचे निर्देश दिले. रविवारी (ता. २२) माणिक सर्जेराव कुसेकर यांच्या शेतात पिंजरा बसविण्यात आला. सोमवारी सकाळी पिंजऱ्यात बिबट्या अडकल्याची माहिती मिळताच वन विभागाचे कर्मचारी सुधीर शितोळे व अमोल पाटोळे यांनी घटनास्थळी धाव घेत बिबट्याला ताब्यात घेतले. प्राथमिक तपासणीत हा बिबट्या सहा ते सात वर्षांचा नर असल्याचे स्पष्ट झाले. वैद्यकीय तपासणीनंतर त्याला माणिकडोह बिबट निवारा केंद्र येथे हलविण्यात आले.
दरम्यान, परिसरात आणखी बिबटे असण्याची शक्यता वन विभागाने व्यक्त केली आहे. त्यामुळे त्याच ठिकाणी पुन्हा पिंजरा लावण्यात आला असून, भक्ष्य म्हणून कोंबड्या ठेवण्यात आल्या आहेत. नलगेवस्ती परिसरात उसाचे क्षेत्र मोठ्या प्रमाणावर असल्याने बिबट्यांचा वावर वाढल्याचे सांगितले जाते. वन विभागाने नागरिकांना विशेषतः सायंकाळी व रात्रीच्या वेळी अधिक दक्षता बाळगण्याचे आवाहन केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com