चिंचणी येथील शेतकऱ्याची आत्महत्या

चिंचणी येथील शेतकऱ्याची आत्महत्या
Published on

आंधळगाव, ता. १५ : चिंचणी (ता. शिरूर) येथील जितेंद्र गंगाराम जेऊघाले (वय ५०, रा. चिंचणी, ता. शिरूर) या शेतकऱ्याने निर्वी-धुमाळवाडी रस्त्यालगतच्या कालव्याजवळील झाडाला गळफास घेतला व आत्महत्या केली. ही घटना मंगळवारी (ता. १४) सकाळी उघडकीस आली.
जेऊघाले शेती व्यवसाय करीत होते. ते नेहमीप्रमाणे मंगळवारी सकाळी घराबाहेर पडल्यावर काही वेळाने ही घटना उघडकीस आली. याबाबत शंकर आण्णा जेऊघाले (वय ३४) यांनी शिरूर पोलिस ठाण्यात माहिती दिली. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच १०८ रुग्णवाहिकेचे वैद्यकीय पथक घटनास्थळी दाखल झाले. डॉ. ऐश्वर्या सोडनकर यांनी प्राथमिक तपासणी करून जखमी अवस्थेतील जितेंद्र यांना खाली उतरविले व त्वरित शिरूर येथील ग्रामीण रुग्णालयात हलविले. मात्र, रुग्णालयात दाखल केल्यानंतर डॉक्टरांनी त्यांचा मृत्यू झाल्याचे घोषित केले.

03069

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com