

मांडवगण फराटा, ता. ४ : घोड उजवा कालव्याच्या उन्हाळी आवर्तनात अनधिकृतपणे पाणी उपसा करून आवर्तन विस्कळित केल्याप्रकरणी सहा शेतकऱ्यांवर कडक कारवाई करण्याची मागणी पाटबंधारे विभागाने केली आहे. शिरूर पोलिसांना यासंदर्भात लेखी पत्र देण्यात आले आहे.
घोड कालव्याचे दुसरे उन्हाळी आवर्तन २३ एप्रिलपासून सुरू झाले आहे. नियमानुसार टेल भागातील शेतकऱ्यांना प्रथम पाणी मिळणे आवश्यक असताना, काही शेतकऱ्यांनी ४ ते ६ इंच व्यासाचे पाइप टाकून मोटारीद्वारे पाणी उपसा केल्याचे समोर आले आहे. वारंवार सूचना देऊनही नियमांचे उल्लंघन होत असल्याने टेल भागात अद्याप पाणी पोहोचलेले नाही. यामुळे शेतकऱ्यांमध्ये संताप असून आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.
याप्रकरणी राजू गोरे, अशोक चौधरी, भरत पवार, रामदास पवार, सागर पवार व रमेश बाजीराव पवार या शेतकऱ्यांची नावे तक्रारीत नमूद आहेत. घोड पाटबंधारे उपविभाग, शिरूर यांनी या प्रकरणाची माहिती श्रीगोंदा येथील कार्यकारी अभियंत्यांनाही दिली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.