आळंदीत ‘स्वच्छ जल - स्वच्छ मन’ अभियान | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आळंदीत  ‘स्वच्छ जल - स्वच्छ मन’ अभियान
आळंदीत ‘स्वच्छ जल - स्वच्छ मन’ अभियान

आळंदीत ‘स्वच्छ जल - स्वच्छ मन’ अभियान

sakal_logo
By

‘स्वच्छ जल-स्वच्छ मन’
आळंदीत रविवारी अभियान

आळंदी, ता.२२ : संत निरंकारी मिशनतर्फे रविवारी (ता. २६) ‘अमृत परियोजने’ अंतर्गत ''स्वच्छ जल - स्वच्छ मन ’ अभियान राबविण्यात येणार आहे. यावेळी जलाशय स्वच्छता आणि प्रबोधनाचा कार्यक्रम राबविण्यात येणार आहे.
‘जल संरक्षण’ आणि ‘जल बचाव’ करण्यासाठी राबविल्या जाणाऱ्या विविध उपक्रमांचे नियोजन करुन ते कार्यान्वित करणे हा या परियोजनेचा मुख्य उद्देश आहे. यामध्ये जलाशयांची स्वच्छता आणि स्थानिक जनतेमध्ये जागृती अभियान राबवून जनसामान्यांना प्रोत्साहित करण्यात येणार आहे. यासाठी जिल्ह्यात एक्केचाळिस ठिकाणी पाच हजार कार्यकर्ते विविध नदीकाठी हा उपक्रम करणार आहेत.
‘अमृत परियोजने’ अंतर्गत पुणे जिल्ह्यातील मुळा, मुठा, इंद्रायणी, नीरा, भीमा, कऱ्हा, घोडनदी, पवना नदी,कुकडी नदी, मीना नदी,वेळू नदी अशा सर्व नद्यांवरील विविध घाट त्याचबरोबर खडकवासला धरण, नाझरे धरण, कात्रज तलाव, पाषाण तलाव अशा ४१ ठिकाणी हा कार्यक्रम राबविण्यात येणार आहे. त्यामध्ये स्थानिक निरंकारी सेवादल तसेच अन्य निरंकारी भक्तगण ५००० हून अधिक संख्येने सहभागी होणार आहेत.

परियोजना संपूर्ण भारतदेशात २७ राज्ये व केंद्रशासित प्रदेशातील ७३० शहरांमध्ये जवळपास ११०० हुन अधिक ठिकाणी राबविण्यात येणार आहे.
- जोगिन्दर सुखीजा, सचिव संत निरंकारी मिशन