इंद्रायणीमध्ये देवीशिंग शेखावत यांच्या अस्थी विसर्जित | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

इंद्रायणीमध्ये देवीशिंग शेखावत यांच्या अस्थी विसर्जित
इंद्रायणीमध्ये देवीशिंग शेखावत यांच्या अस्थी विसर्जित

इंद्रायणीमध्ये देवीशिंग शेखावत यांच्या अस्थी विसर्जित

sakal_logo
By

आळंदी, ता. २६ : माजी राष्ट्रपती श्रीमती प्रतिभाताई पाटील यांचे दिवंगत पती डॉ. देवीशिंग शेखावत यांचे अस्थिविसर्जन कार्यक्रम इंद्रायणी नदी घाटावर विधिवत झाला. अमरावतीचे माजी आमदार व मुलगा रावसिह शेखावत यांनी अस्थिपूजन करून इंद्रायणी नदीपात्रात विसर्जन केले. यावेळी माजी नगराध्यक्ष बबनराव कुऱ्हाडे, नरहरी महाराज चौधरी, नारायण महाराज मोहोड, मंडलाधिकारी स्मिता डामसे, आळंदी पोलिस ठाण्यातील वरिष्ठ पोलिस निरिक्षक रमेश पाटील, मच्छिंद्र शेंडे, पृथ्वी पाटील व शेखावत पाटील परिवारातील नातेवाईक उपस्थित होते. यावेळी आळंदी पोलिसांचा बंदोबस्त नेमला होता.