झाड कोसळल्याने आळंदीत वाहतूक कोंडी

झाड कोसळल्याने आळंदीत वाहतूक कोंडी

आळंदी, ता.१: सोसाट्याचा वारा आणि कडाडणाऱ्या विजांसह आळंदी परिसरात आज (ता.१) गारांचा पाऊस झाला. वाऱ्यायामुळे आळंदी, वडगाव, घेनंद रस्त्यावर झाडे उन्मळून पडली. यामुळे काही काळ वाहतूक ठप्प झाली. प्रशासनाने ही झाडे जेसीबीच्या साहाय्याने हटविण्यात आली.

गेली चार दिवस सायंकाळी पाऊस पडत आहे. हवेत आज सकाळपासूनच उकाडा आणि कडक ऊन होते. मात्र, सायंकाळी सहानंतर जोराचा वारा सुरु झाला. अनेक ठिकाणी फ्लेकस फाटले. काही वेळातच गारांचा जोरात पाऊस पडू लागला. गारांच्या पावसामुळे हवेत गारवा निर्माण झाला. वातावरण काहीसे आल्हाददायक झाले. आळंदी, चऱ्होली वडमुखवाडी भागात चांगला पाऊस पडला. दरम्यान, अचानक सुरू झालेला वारा आणि पावसामुळे रस्त्यावरील तसेच घरगुती वीजपुरवठाही बंद करण्यात आला.

दरम्यान, शिक्रापूर चाकणमार्गे आळंदीला येणाऱ्या आणि आळंदीहून चाकण शिक्रापूरला जाणारी वाहतूक काही काळ खोळंबली. आळंदी पोलिस, पालिका कर्मचारी आणि वीज मंडळाचे कर्मचारी घटनास्थळी जाऊन जेसीबीच्या साहाय्याने झाडे हटविली. यामुळे वाहतूक पूर्ववत झाली.

03457

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com