आळंदी-चाकण अडीच हजार रोपांची लागवड

आळंदी-चाकण अडीच हजार रोपांची लागवड

आळंदी, ता. ५ : चाकण-आळंदी रस्त्यावरील आळंदी फाट्याजवळ विविध सेवाभावी संस्था, कामगारांनी केलेल्या सामुहिक श्रमदानातून अडीच हजार देशी वृक्षांच्या रोपांची लागवड केली. चाकण वनपरिक्षेत्र कार्यालयांतर्गत सोमवारी (ता. ५) जागतिक पर्यावरण दिनानिमित्त हा उपक्रम पार पडला.

आझादी का अमृत महोत्सव असल्याने पंच्याहत्तर प्रकारचे देशी वृक्ष आणि एकूण साडेसात हजार वृक्षारोपण महिन्याभरात केले जाणार आहेत. जागतिक पर्यावरणदिन असल्याने चाकणमधील विविध सामाजिक संस्था, शाळा, रोटरी क्लब, चाकण शहर डॉक्टर असोसिएशन, चाकण औद्योगिक विभागातील विविध कंपन्यांमधील अधिकारी, कामगार यांच्यासह पाचशे ते सहाशे पर्यावरणप्रेमींनी वृक्षारोपण चळवळीत सहभाग घेतला. यासाठी चाकण वनपरिक्षेत्र कार्यालयाने नियोजन केले होते. अनेकांनी सोमवारी स्वयंप्रेरणेने श्रमदान केले. विविध देशी रोपांची उपलब्धता यावेळी आधीच करून ठेवली होती.

याबाबत चाकण वनविभाग वनपरिमंडळ अधिकारी योगिता नाईकवडी विर यांनी सांगितले. जागतिक पर्यावरण दिनानिमित्त चाकण वनविभागाने आयोजित कार्यक्रमास चांगला प्रतिसाद मिळाला. यासाठी साधारण फेब्रुवारी महिन्यापासून तयारी सुरू होती. वृक्षारोपणासाठी खड्डे खोदून ठेवले होते. नुकतेच पाऊस पडल्याने मातीही सुकली होती. याचा फायदा रोपण करताना झाला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com