आळंदीचा पाणीपुरवठा विस्कळित
आळंदी, ता. १७ : पुण्याला जाणाऱ्या भामा आसखेड धरणाच्या पाणीपुरवठा पाइपलाइनला झालेली गळती दुरुस्तीस वेळ लागणार असल्याने दिवसभर विस्कळित पाणीपुरवठा झाला. गळती दुरुस्त झाल्यानंतर विभागवार पाणीपुरवठा सुरळीत होणार असल्याची माहिती पाणीपुरवठा विभागप्रमुख शीतल जाधव यांनी दिली.
त्यांनी सांगितले की, आळंदी शहरास पुणे महानगरपालिकेच्या पाइप लाइनवरून पाणीपुरवठा होतो. पुणे महानगरपालिकेची सतराशे मिलिमीटर पाइपलाइनला गळती झाली. तसेच, पुणे शहरात पाणी कपात धोरणामुळे पाणी बंद असल्याने सदर पाइपलाइन गळती काढण्याचे काम सुरू केले. मोठ्या स्वरूपातील काम असल्यामुळे कामास विलंब लागत आहे. काम पूर्ण झाल्यानंतर कुरळी येथील जॅकवेल केंद्रावर पाणी पोहोचण्यास सुमारे चार तास कालावधी लागणार आहे. त्यानंतर आळंदी येथे पाणी पोहोचण्यास सुमारे अर्धा तास कालावधी लागेल. अशी शक्यता गृहित धरुन काम सुरळीत पार पडल्यास आळंदी शहरात भामा आसखेड वरून पाणी येण्यास साधारण आठ वाजण्याची शक्यता आहे. त्यानंतर जलकुंभ भरून शहरात उशिराने पाणीपुरवठा विभागवार सुरू करण्यात येणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

