आळंदी येथे सह्यांची मोहीम

आळंदी येथे सह्यांची मोहीम

Published on

आळंदी, ता. ११ : राज्यात सुरू असलेल्या फोडाफोडीचे आणि पक्षांतरांच्या राजकारणाचा संताप व्यक्त करता यावा, यासाठी आळंदीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने मतदारांच्या सह्यांची मोहीम घेण्यात आली.

‘मनसे’ अध्यक्ष राज ठाकरे यांच्या आदेशानुसार राज्यात ‘एक सही संतापाची’ नावाखाली ही मोहीम राबवली जात आहे. याचाच एक भाग म्हणून आळंदीमध्येदेखील या मोहिमेचे आयोजन करण्यात आले होते.
या वेळी शहरातील अनेक नागरिकांनी सही करुन प्रतिसाद दिला. या मोहिमेत शेतकरी, व्यापारी, तरुण, विद्यार्थ्यांसह प्रत्येक घटकाने उपस्थित राहून संताप व्यक्त केला. अजय तापकीर, मंगेश काळे, वैभव काळे, अभिजित गुंड, ऋषी सानप, तेजस नागरगोजे, सुदाम पारधी, भरत दांगट, सौरभ वाकचौरे, योगेश मोरे, राहुल गायकवाड, ललित राणे, ज्ञानेश्वर वाढेकर, नामदेव भोसले या ‘मनसे’ सैनिकांनी पुढाकार घेतला.
-------------

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.