आळंदी येथे नागदेवतांची मिरवणूक

आळंदी येथे नागदेवतांची मिरवणूक

आळंदी, ता. २१ : सनई चौघड्याच्या सुरात मिरवणूक आणि चांदीच्या नाग प्रतिमेचे शहरात सोमवारी (ता. २१) पारंपरिक पद्धतीने विधिवत पूजन करून आळंदीकर महिला भाविकांनी नागपंचमीचा सण साजरा केला.

महिलांनी घरोघरी देव्हाऱ्याजवळ नाग-नरसोबाचे चित्र चिटकवून देवाजवळ रांगोळी काढून नाग-नरसोबा या देवतेला लाह्या, दूध, पुरणपोळीचा नैवेद्य दाखविला.

दरम्यान, संत ज्ञानेश्वर महाराज संस्थानच्यावतीने चांदीच्या नाग प्रतिमेची सनई चौघड्यात मिरवणूक काढली. जुन्या नगरपरिषदेच्याजवळील जागेत नाग देवतेची पूजा केली. त्यानंतर विष्णू मंदिर, राम मंदिर येथे पूजन केले. त्यानंतर नागदेवतेचे माऊलींच्या मंदिरातील पालखी मंडपात आगमन झाले. येथे नाग देवताची पूजा, पुरण पोळीचा नैवेद्य दाखवण्यासाठी तसेच दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केली होती. मंदिरामध्ये नागपंचमीनिमित्त अनेक महिलांनी फुगड्यांच्या खेळाचा आनंद लुटला.

यावेळी पहिल्या श्रावणी सोमवारनिमित्त देवुळवाड्यातील सिद्धेश्वर मंदिरात दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केली होती.
तर सामाजिक कार्यकर्ते राहुल चव्हाण यांच्या माध्यमातून माऊलींच्या दर्शनासाठी आलेल्या भाविकांना दूध प्रसादाचे वाटप केले. यावेळी आळंदी देवस्थानचे व्यवस्थापक ज्ञानेश्वर वीर, आळंदी पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक रमेश पाटील, मच्छिंद्र शेंडे, प्रकाश पानसरे, नंदकुमार वडगावकर आदी उपस्थित होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com