आळंदीत गणेश मूर्ती बनविण्याची कार्यशाळा

आळंदीत गणेश मूर्ती बनविण्याची कार्यशाळा
Published on

आळंदी, ता. ३० : आळंदी नगरपरिषदेने आळंदी आणि पंचक्रोशीत यंदाचा गणेश उत्सव पर्यावरणपूरक पद्धतीने साजरा व्हावा यासाठी पुढाकार घेतला आहे. याचाच एक भाग म्हणून ‘माझी वसुंधरा अभियान’ अंतर्गत शाडू मातीच्या गणेश मूर्ती बनविण्याच्या कार्यशाळेचे आयोजन केले आहे. कार्यशाळेत नगरपरिषदेचे अधिकारी, कर्मचारी आणि शालेय विद्यार्थी उत्साहाने सहभागी होऊन शाडू मातीच्या माध्यमातून गणेश मूर्ती बनविल्या.
याबाबत मुख्याधिकारी कैलास केंद्रे म्हणाले, ‘‘गणेशोत्सव कालावधीत प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती, विषारी रंग, प्लास्टिक आणि थर्मोकोलची सजावट इत्यादी गोष्टींचा वापर मोठ्या प्रमाणावर होतो. हे सर्व पाण्यात न विरघळणारे आणि विषारी पदार्थ आहेत. या मुर्त्यांचे नद्या, तलाव, विहिरी यांमध्ये विसर्जन केल्यानंतर त्यांचे अवशेष पाण्यात न विरघळता तसेच राहतात परिणामी जलप्रदूषण होऊन पाण्यातील अनेक जीवांच्या अस्तित्वाला धोका निर्माण होतो. त्यामुळे पर्यावरण पूरक मूर्तीचा वापर, पर्यावरणपूरक सजावट, निर्माल्य संकलन करून खत निर्मिती इत्यादी बाबत जनजागृती करून सणांच्या काळात होणारे जलप्रदूषण कमी होवू शकते.’’
पर्यावरणपूरक मूर्त्यांमध्ये शाडू मातीपासून बनविलेल्या मूर्तीचा समावेश होतो. मातीमध्ये कोणत्याही प्रकारची विषारी द्रव्ये नसतात. या मातीपासून बनविलेल्या मूर्ती पाण्यात विरघळून जातात. त्यामुळे कोणत्याही प्रकारचे जलप्रदूषण होत नाही. गणेशप्रेमी नागरिकांनी पाण्यात न विरघळणाऱ्या व जल प्रदूषण करणाऱ्या गणेश मुर्त्या विकत न घेता पर्यावरणपूरक अशा शाडूच्या मातीच्या मुर्त्या विकत घ्याव्यात किंवा घरच्या घरी बनवून पर्यावरण संवर्धनात योगदान देण्याचा प्रयत्न करावा यासाठी आळंदी नगरपरिषदेमार्फत शाडू मातीच्या मूर्ती बनविण्याची कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. कार्यशाळेत आळंदी नगरपरिषद शालेय विद्यार्थ्यांनी, शिक्षक वृंदांनी, नगरपरिषद अधिकारी, कर्मचारी वर्गाने मोठ्या उत्साहाने सहभाग नोंदविला. कार्यशाळेस शरद लोहार यांनी गणेश मुर्त्या बनविण्याचे मार्गदर्शन केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com