

आळंदी, ता. १५ : बनावट चावीने दुचाकी चोरण्याचा प्रयत्न करणाऱ्या चोराला स्थानिक नागरिकांनी पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. चोराचा साथीदार मात्र पळून जाण्यात यशस्वी झाला. ही घटना केळगावमधे सिद्धबेट परिसरात शनिवारी (ता.१४) पहाटे तीनच्या सुमारास घडली.
राज अजबराव इंगळे (वय २० वर्षे, रा. थेरगाव हॉस्पिटलचे पाठीमागे, थेरगाव, ता. हवेली, जि. पुणे) यांस पोलिसांनी ताब्यात घेतले. तर त्याचा साथीदार रोहन शिंदे, (रा. येलवडी देहुफाटा, ता. मावळ, जि. पुणे) पळून जाण्यात यशस्वी झाला. दोघांवरही आळंदी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला. याप्रकरणी फिर्याद सुदाम मुंढे (रा.केळगाव, ता.खेड) यांनी दिली.
आळंदी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी इंगळे आणि शिंदे दोघे जण केळगावमध्ये चोरी करण्याच्या उद्देशाने शनिवारी (ता.१४) आले होते. अगोदर तेथील गल्लीत रस्त्याच्या कडेला उभ्या दुचाकींची पाहणी केली.त्यानंतर तीन चार दुचाकीस त्यांच्याकडील बनावट चावी लावून लॉक तोडण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, तोपर्यंत आजूबाजूचे रहिवासी जागृत झाले आणि चोरी करत असलेल्या राज इंगळे याला पकडले. मात्र त्याचा साथीदार रोहन शिंदे मात्र पळून गेला. नागरिकांनी इंगळे याला बेदम चोपले. त्यानंतर आळंदी पोलिसांच्या ताब्यात दिले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.