आळंदीत सहा दिवसीय डिझाईन थिंकिंग

आळंदीत सहा दिवसीय डिझाईन थिंकिंग
Published on

आळंदी, ता. ३० : प्राध्यापक, संशोधक आणि उद्योग व्यावसायिकांना इंडस्ट्री ५.० च्या अनुषंगाने नावीन्यपूर्ण उपाय शोधण्यासाठी एकत्र आणण्याच्या उद्देशाने आळंदीतील माईर्स महाविद्यालय आयोजित कल्टीव्हेटिंग डिझाईन थिंकिंग अँड इनोव्हेशन - अ पाथवे फॉर सस्टेनेबिलिटी इन इंडस्ट्री ५.० या विषयावर फॅकल्टी डेव्हलपमेंट प्रोग्रॅम (FDP) झाला.

बुधवार (ता. २३) ते सोमवार (ता. २८) या कालावधीत फॅकल्टी डेव्हलपमेंट प्रोग्रॅम ए.आई.सी.टी.ई - अटल ॲकॅडमी आणि एम. आई. टी महाविद्यालयाचे बी.बी.ए आणि बी.बी.ए (आय.बी.) विभागाद्वारे आयोजित केला होता. कार्यक्रमाचे उद्‍घाटन सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. पराग काळकर यांनी केले. पहिल्या दिवशी अध्यक्षीय भाषण डॉ. मिलिंद पांडे, प्र-कुलगुरू डॉ. विश्वनाथ कराड एमआयटी वर्ल्डपीस युनिव्हर्सिटी यांनी केले. त्यांनी आरोग्य आणि वैद्यकशास्त्रातील सर्जनशीलता आणि नाविन्यपूर्णतेला चालना देण्यासाठी डिझाइन थिंकिंगचे महत्त्व अधोरेखित केले. डॉ. एस. बालसुब्रमण्यन, डॉ. ए. जी. मतानी, अतुल बेनगेरी, डॉ. अविनाश भालेराव, डॉ. योगेश देशपांडे, मिलिंद बावा, डॉ. सारिका लोहाना आदींनी मार्गदर्शन केले.
या सहा दिवसांच्या एफ. डी. पी. मध्ये डिझाइन थिंकिंगचे मूलभूत तत्त्वे, त्याचे सामाजिक परिणाम आणि शाश्वत विकासासह उद्योजकता यांचे एकीकरण यासह विविध विषयांवर तज्ञांच्या नेतृत्वाखालील सत्रांमध्ये मार्गदर्शन केले. यामध्ये एकूण दहा सत्रांचे आयोजन केले होते. यात पुणे आणि पुणे शहराबाहेरून ५० हून अधिक प्राध्यापक, विद्यार्थी आणि कार्यरत व्यावसायिकांनी भाग घेतला. हँड्स-ऑन प्रशिक्षण सत्रांमध्ये आणि अलीकडील शोधनिबंध केंद्रित सहयोगात्मक चर्चासत्र पार पडले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com