सोळू येथे अपघातात 
दुचाकीस्वाराचा मृत्यू

सोळू येथे अपघातात दुचाकीस्वाराचा मृत्यू

Published on

आळंदी, ता. ९ : अज्ञात चारचाकी वाहनाने दुचाकीला धडक दिल्याने झालेल्या अपघातात एकाचा मृत्यू झाला. बाळू पोपट केवळ (वय ५४, रा. ठाकरवस्ती, चऱ्‍होली खुर्द), असे मृत्यू झालेल्याचे नाव आहे.
हा अपघात २८ सप्टेंबरला आळंदी- मरकळ रस्त्यावर सोळू गावचे हद्दीत झाला. याप्रकरणी अज्ञात चारचाकी वाहनचालकावर आळंदी पोलिस ठाण्यात सोमवारी (ता. ७) गुन्हा दाखल केला. याबाबत फिर्याद मृताचा मुलगा लखन बाळू केवळ यांनी दिली. आळंदी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बाळू केवळ हे त्यांच्याकडील दुचाकीवरून (क्र. एम.एच. १४ एफ.यू. ३१५०) मरकळहून आळंदीकडे घरी जाण्यासाठी येत होते. यावेळी सोळू येथे त्यांच्या दुचाकीस अज्ञान वाहनाने ठोकरले. या अपघातात डोक्याला आणि कानाजवळ गंभीर मार लागल्याने त्यांचा मृत्यू झाला. याबाबत घटनास्थळावरून अज्ञात वाहन चालक पळून गेला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com