रविवारपासून ज्ञानेश्वर-तुकाराम स्मृती व्याख्यानमाला
आळंदी, ता. २२ : संत श्री ज्ञानेश्वर-तुकाराम स्मृती व्याख्यानमाला रविवार (ता. २४) पासून शनिवार (ता. ३०) पर्यंत एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीच्या संत ज्ञानेश्वर सभागृह, कोथरूड, पुणे येथे होणार आहे. या व्याख्यानमालेचे यंदा २९ वे वर्ष आहे.
एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी, विश्वशांती केंद्र (आळंदी), माईर्स एमआयटी, पुणे, भारत आणि संत श्री ज्ञानेश्वर-संत श्री तुकाराम महाराज स्मृती व्याख्यानमाला न्यास यांच्या वतीने आयोजित केली आहे. त्याचे उद्घाटन रविवारी (ता. २४) दुपारी चार वाजता उज्जैनचे पंडित विजयशंकर मेहता आणि संत एकनाथ महाराजांचे चौदावे वंशज हभप योगीराज महाराज गोसावी पैठणकर यांच्या उपस्थित होणार आहे. यावेळी संगणक शास्त्रज्ञ डॉ. विजय भटकर प्रमुख पाहुणे असतील. अध्यक्षस्थानी एमआयटी डब्ल्यूपीयूचे संस्थापक अध्यक्ष व युनेस्को अध्यासनाचे प्रमुख प्रा. डॉ. विश्वनाथ कराड असतील.
व्याख्यानमालेचा समारोप शनिवारी (ता. ३०) सकाळी ११ वाजता नवी दिल्ली येथील मौलाना आझाद नॅशनल उर्दू विद्यापीठाचे माजी कुलगुरू फिरोज बख्त अहमद यांच्या प्रमुख उपस्थित होईल. यावेळी एअर मार्शल भूषण गोखले, विशेष अतिथी म्हणून उपस्थित राहतील.
२५ ते २९ नोव्हेंबर या कालावधीत दुपारी चार वाजता होणाऱ्या व्याख्यानमालेत वैश्विक स्तरावरील बनारस हिंदू विश्वविद्यालयाचे महामहोपाध्याय प्रा. सदाशिव द्विवेदी हे ‘भारतीय ज्ञान परंपरा व विश्वशांती’ या विषयावर व्याख्यान देणार आहेत. याशिवाय प्राध्यापक डॉ. रामकृष्ण भट हे ‘विज्ञान, अध्यात्म आणि धार्मिक ग्रंथांचे संघटन,’ मुंबई विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. संजय देशमुख हे ‘विज्ञान आणि अध्यात्माचा सुसंवाद जागतिक शांततेसाठी’ याविषयी मार्गदर्शन करतील. ‘आयकेएस आणि एनईपी २०२० चा मार्ग उजळणे’ याविषयी माजी मुख्य वनसंरक्षक व हभप रंगनाथ नाईकडे, अभिनेते सुरेंद्र पाल हे ‘द्रोणाचार्य-धर्म, नीती आणि कर्तव्य यांच्यातील संघर्षाचे प्रतीक’ आणि यूजीसीचे माजी उपसंचालक डॉ. भूषण पटवर्धन ‘जीनोम ते ओम’ या विषयावर व्याख्याने देणार आहेत.
या व्याख्यानमालेला जोडूनच कार्यशाळा होईल. यामध्ये डॉ. संजय उपाध्ये, डॉ. ज्ञानश्री लेले, स्वामी आर्यानंद, डॉ. नीलेश ओक, विष्णू भिसे, आचार्य श्री शिवम, शेखर सेन, डॉ. अक्षय मल्होत्रा, डॉ. श्रुती निरगुडकर, डॉ. ज्ञानदेव निलवर्णा, संकल्प संघई, डॉ. जगदीश हिरेमठ शिवव्याख्याते नितीन बालगुडे यांची व्याख्याने होणार आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

