भंडारा डोंगरावर थांबली पक्ष्यांची पाण्यासाठीची वणवण

भंडारा डोंगरावर थांबली पक्ष्यांची पाण्यासाठीची वणवण
Published on

आळंदी, ता. २६ : कडक उन्हाळ्यात पक्ष्यांची पाण्याची तहान भागावी व वणवण थांबविण्यासाठी मिथुन पाटील आणि त्यांच्या कुटुंबांनी पुढाकार घेतला आहे. आळंदी, भंडारा डोंगर परिसरातील गणामध्ये पंचवीस पत्र्यांचे डब्बे विशिष्ट आकारात कापून झाडांवर लटकवले आहेत. चाकण औद्योगिक भागात वृक्षसंवर्धनासाठी काम करणाऱ्या मन हर्ष फाउंडेशनच्या माध्यमातून पक्ष्यांची उपासमार टळण्यासाठी चारा आणि पाण्याची सोय केली आहे.

निघोजे येथील मिथुन पाटील वृक्षसंवर्धनासाठी काम करत आहे. ते कंपनीतील काम सांभाळून वृक्ष लागवड, संवर्धन आणि बियाणे गोळे करणे आदी काम करतात. त्या कामात त्यांना त्यांची मुलगी हर्षाली पाटील मदत करते. सोबत विनोद अहिरे, वेदांत पाटील, संदीप पाटील, श्रीनिवास पाटील, रमेश लोहार, उमेश पाटील, एकनाथ सोनवणे ही मित्रमंडळीही साथ देतात.

सध्याच्या उन्हाळ्याच्या दिवसांत पाणी, सावली आणि खाद्य कमी असल्याने पक्ष्यांची उपासमार होण्याची शक्यता अधिक असते. त्यांना पिण्याच्या पाण्याची आणि आंघोळीसाठीची सोय व्हावी या हेतूने पत्र्याचे डब्ब्यांचा वापर पाटील यांनी केला आहे. प्रथम त्यांनी ते राहत असलेल्या सोसायटीतील दोन झाडांना लटकवले. यामुळे त्या ठिकाणी पाणी पिण्यासाठी पक्षी येवू लागले. मग हाच प्रयोग त्यांनी भंडारा डोंगर परिसरात राबविण्याचा प्रयत्न केला. भंडारा डोंगर भागातील मंदिर परिसर, मागील बाजूची वनराई तसेच रस्त्याच्या कडेला असणाऱ्या काही वृक्षांना हे पत्र्याचे डब्बे लटकवले.


पदरमोड करून भंगारवाल्याकडून डब्यांची खरेदी
मिथुन पाटील यांनी पदरमोड करून भंगारवाल्याकडून तेलाचे डबे पंधरा रुपयांना खरेदी करून पक्ष्यांसाठी ही सोय केली आहे. आता भंडारा डोंगरावर दर्शनासाठी, फिरायला येणारे तसेच सकाळी व्यायामासाठी येणारे अधूनमधून या डब्ब्यामध्ये धान्य, तसेच पाणी टाकून जातात. यामुळे पक्ष्यांची चांगली सोय झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. पाटील यांच्या उपक्रमाचे परिसरातून कौतुक होत आहे.

05555

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com