मराठा समाजाचा आज आळंदीत वधूवर मेळा

मराठा समाजाचा आज 
आळंदीत वधूवर मेळा
Published on

आळंदी, ता. २६ : येथील वडगाव रस्त्यावरिल ज्ञानसागर मंगल कार्यालयात मराठा सोयरिक संस्थेच्यावतीने रविवारी (ता. २७) सकाळी अकरा वाजता मराठा समाजाचा ९८वा इच्छुक वधु वर परिचय मेळा मोफत स्वरूपात आयोजित केला आहे.
याबाबत शिवसेनेचे आळंदी शहर प्रमुख राहुल चव्हाण, सेवानिवृत्त वनअधिकारी प्रभाकर कड, मराठा सोयरिक संस्थेचे संस्थापक अशोक कुटे यांनी नियोजन केले आहे. मेळाव्यासाठी येताना विवाहेच्छुकांनी सोबत आधार कार्ड, बायोडाटा आणि पालकांना सोबत आणावयाचे आहे. समाजातील विवाहेच्छुंची गरज ओळखून आमच्या संस्थेमार्फत आतापर्यंत ९७ मेळावे यशस्वी केले आहेत. आतापर्यंत साडेचार हजारहून अधिक जणांचे सोयरिक जमवले आहे. यामध्ये विधवा, विधुर, घटस्फोटीत अशा साडेसहाशे जणांचे लग्न जमवले असल्याची माहिती संस्थेचे संस्थापक अशोक कुटे यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com