चऱ्होलीत आगीत घर भस्मसात
आळंदी, ता. ८: चऱ्होली खुर्द (ता. खेड) येथील घराला लागलेल्या आगीमध्ये संपूर्ण घर भस्मसात झाले. यावेळी घराच्या वरच्या मजल्यावर दोन सिलिंडरचा स्फोट झाला. कोणताही अनर्थ घडू नये यासाठी आळंदी नगर परिषदेच्या अग्निशमन दलाच्या जवानांनी आग आटोक्यात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही.
आगीची घटना शुक्रवारी (ता. ८) आळंदी जवळील चऱ्होली खुर्द बाह्यवळण मार्गावर साईराम डेव्हलपर्स येथील नर्सिंग कोयले यांच्या मालकीच्या घरामध्ये दुपारी साडेबाराच्या सुमारास घडली. मुख्याधिकारी माधव खांडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली अग्निशमन पथकाने खालील कर्मचाऱ्यांच्या समन्वयाने व धाडसाने आग नियंत्रणात आणली. लिडिंग फायरमन प्रसाद बोराटे, अमित घुंडरे, सिध्दार्थ गावडे, साहिल काळे, अजित कुऱ्हाडे, विनायक सोळंकी, दिगंबर कुऱ्हाडे यांनी आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न केले.
आळंदी पोलिस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी तसेच चऱ्होली अग्निशमन केंद्राचे कर्मचारी उपस्थित होते व त्यांनीही आग नियंत्रण कार्यात सहकार्य केले.
या घटनेमध्ये जीवितहानी झाली नाही, परंतु घरातील सर्व जीवनावश्यक साहित्य जळून खाक झाले आहे. आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.
आळंदी नगरपरिषद मुख्याधिकारी माधव खांडेकर यांनी सांगितलेल्या माहितीनुसार, आळंदी शहर पोलिस ठाण्यातील पोलिस मच्छिंद्र शेंडे यांना याबाबत पहिली खबर मिळाली. तत्काळ नगर परिषदेकडे अग्निशमन दलाची गाडी मागवली. आळंदी नगरपरिषद अग्निशमन दलाची गाडी घटनास्थळी तत्काळ पाठवली.
घटनास्थळी पोहोचल्यानंतर आगीचा उगम दुसऱ्या मजल्यावरील किचनमध्ये असल्याचे निदर्शनास आले. जवळील इमारतीच्या टेरेसवरून खिडकीच्या काचा फोडून आग आटोक्यात आणण्याचे काम सुरू करण्यात आले. जवानांनी प्रचंड धाडस व तत्परता दाखवत दोन गॅस सिलिंडर सुरक्षितपणे बाहेर काढले.
06153
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.